जाहिरात

Smriti Mandhana: स्मृती मंधानाची लग्न तुटल्यानंतर पहिली पोस्ट, 'त्या' एका गोष्टीनं सर्वांचच लक्ष वेधलं

सोशल मीडियावर वाढलेल्या चर्चा आणि प्रश्नांना शांत करण्याचा प्रयत्न पलाशच्या बहिणीने केला होता.

Smriti Mandhana: स्मृती मंधानाची लग्न तुटल्यानंतर पहिली पोस्ट, 'त्या' एका गोष्टीनं सर्वांचच लक्ष वेधलं
  • भारतीय महिला क्रिकेटपटू स्मृती मानधनाचा विवाह अनिश्चित कालावधीसाठी पुढे ढकलण्यात आला आहे
  • स्मृती मानधनाने विवाह पुढे ढकलल्यानंतर सोशल मीडियावर लग्नाशी संबंधित सर्व प्री-वेडिंग पोस्ट्स डिलीट केल्या
  • स्मृतीने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर लग्न तुटल्यानंतर पहिल्यांदाच पोस्ट शेअर केली आहे.
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.
मुंबई:

Smriti Mandhana First Post After Wedding Postponed: भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार खेळाडू स्मृती मानधना आणि संगीतकार पलाश मुच्छल यांचा 23 नोव्हेंबर रोजी होणारा विवाह पुढे ढकलण्यात आला.  त्यानंतर, स्मृतीने पहिल्यांदाच सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. तिची ही नवी पोस्ट व्हायरल होत आहे. लग्न तुटल्यानंतर स्मृती कुठेही व्यक्त झाली नव्हती. त्यामुळे हे लग्न तुटलं आहे की पुढे ढकललं गेलं आहे याची फक्त चर्चाच सुरू होती. अधिकृत असं काही नव्हतं. ती आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मपासून ही लांब होती.  त्यामुळे तिच्या चाहत्यांना ती काय बोलते याकडे लक्ष लागलं होतं. त्यात तिने आता एक पोस्ट आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर केली आहे. त्यावर तिच्या चाहत्यांनी कमेंटचा पाऊस पाडला आहे.  

तिने पहिली पोस्ट जी केली आहे  त्यात एका ब्रँडसोबतच्या कोलॅबरेशनचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये स्मृतीने महिला विश्वचषक 2025 च्या उपांत्य आणि अंतिम सामन्यातील विजयाचे क्षण दाखवले आहेत. तिने या पोस्टला 'जिंकण्याचे क्षण, खरी चर्चा आणि गेम चेंजर ठरणाऱ्या प्रथा' असे कॅप्शन दिले आहे. मात्र, पलाश मुच्छलसोबतचा विवाह लांबणीवर पडल्यानंतर समोर आलेल्या या व्हिडिओमध्ये चाहत्यांनी एक गोष्ट लगेच लक्षात आली. ही गोष्ट त्यांच्या नजरेतून सुटली नाही. त्यावरून नेटकऱ्यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. 

ती गोष्ट म्हणजे स्मृतीच्या बोटात 'एंगेजमेंट रिंग' (साखरपुड्याची अंगठी) नव्हती. हा व्हिडिओ साखरपुड्या आधी शूट करण्यात आला असावा, असा दावा केला जात आहे. असं असलं तरी, यामुळे चर्चांना उधाण आले आहे. यापूर्वी, स्मृती मानधनाचे वडील श्रीनिवास यांच्या आजारपणामुळे हा विवाह अनिश्चित कालावधीसाठी पुढे ढकलण्यात आला आहे असं सांगितलं जात होतं. विवाह पुढे ढकलल्यानंतर स्मृतीने सोशल मीडियावरील लग्न समारंभापूर्वीच्या (प्री-वेडिंग) सेलिब्रेशनशी संबंधित सर्व पोस्ट डिलीट केल्या आहेत. 

या पोस्टमध्ये भारतीय संघातील सहकारी जेमिमा रॉड्रिग्ससह 'समझा हो ही गया' गाण्यावर डान्स करतानाचा साखरपुड्याच्या घोषणेचा व्हिडिओ देखील समाविष्ट होता. हा व्हिडिओ जेमिमाच्या अकाउंटवरही दिसत नाही. सोशल मीडियावर वाढलेल्या चर्चा आणि प्रश्नांना शांत करण्याचा प्रयत्न करत पलाशची पार्श्वगायिका बहीण पलक मुच्छलने एक छोटी नोट शेअर केली होती. तिने स्पष्ट केले होते की, वधूच्या वडिलांच्या आरोग्याच्या कारणामुळेच विवाह पुढे ढकलण्यात आला आहे.
 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com