IND Vs SA: दक्षिण आफ्रिकेसमोर टीम इंडियाचे लोटांगण, 408 धावांनी लोळवलं, मालिकाही जिंकली

पराभवामुळे टीम इंडियाने ही मालिका २-० ने गमावली आहे. या विजयासह, दक्षिण आफ्रिकेने दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारताचा २-० असा क्लीन स्वीप दिला आहे. 

जाहिरात
Read Time: 2 mins

India vs South Africa 2nd Test Match: दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत भारतीय संघाला तब्बल 408 धावांनी दारुण पराभव पत्करावा लागला. दक्षिण आफ्रिकेने टीम इंडियासमोर 549 धावांचे लक्ष्य होते, परंतु भारतीय संघ पाठलाग करताना केवळ 140 धावा करू शकला. या पराभवामुळे टीम इंडियाने ही मालिका 2-0 ने गमावली आहे. दक्षिण आफ्रिकेने दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारताचा २-० असा क्लीन स्वीप दिला आहे. 

टीम इंडियाचा दारुण पराभव!

गुवाहाटीतील बरसापारा क्रिकेट स्टेडियमवर दुसरा भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका कसोटी सामना  खेळवला गेला.  आज  कसोटीच्या पाचव्या दिवशी टीम इंडियाला विजयासाठी 549 धावांचे लक्ष्य ठेवण्यात आले होते. मात्र भारतीय संघाचा डाव 140 धावांमध्येच आटोपला. धावांनुसार बाबतीत भारतीय संघाचा हा सर्वात मोठा पराभव आहे. आफ्रिकन संघापूर्वी, 31 डिसेंबर 1958 रोजी वेस्ट इंडिजने भारताचा एक डाव आणि 336 धावांनी पराभव केला. पण यावेळी आफ्रिकन संघाने 408 धावांनी पराभव करून तो विक्रम मोडला.

( नक्की वाचा : कोण आहे स्मृती मानधनाचा बॉयफ्रेंड पलाश मुच्छल? दोघांमध्ये किती आहे वयाचं अंतर, कुणाची कमाई जास्त? )

दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेने त्यांच्या पहिल्या डावात 489 धावा केल्या. सेनुरन मुथुस्वामीच्या 109 धावांमुळे दक्षिण आफ्रिकेला 489 धावांपर्यंत पोहोचता आले. ट्रिस्टन स्टब्सनेही 49 धावा केल्या. या दोन डावांव्यतिरिक्त, काइल व्हेरेनने 45 धावा केल्या. भारताकडून पहिल्या डावात कुलदीप यादवने चार बळी घेतले, तर जडेजाने दोन बळी घेतले. त्यानंतर, भारत त्यांच्या पहिल्या डावात फक्त 201 धावा करू शकला.

Palash Muchhal : 'स्मृतीपेक्षाही दोघांची जास्त जवळीक', पलाश ढसढसा रडला, आईनं सांगितलं 'त्या' दिवशी काय घडलं?

Topics mentioned in this article