Smriti Mandhana and Palash muchal viral video : भारतीय महिला क्रिकेट संघाची धडाकेबाज फलंदाज स्मृती मंधाना आणि प्रसिद्ध संगीतकार पलाश मुच्छल येत्या 23 नोव्हेंबरला लग्नबंधनात अडकणार आहेत. स्मृती आणि पलशच्या लग्नाची तुफान चर्चा जगभरात रंगली आहे. या क्यूट कपलचे रोमॅन्टिक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.दोघांचं लग्न मोठ्या धुमधडाक्यात होणार आहे.
अशातच आज स्मृती मंधानाने हळदी समारंभात धमाल केली आहे. स्मृतीच्या हळदीचे सुंदर फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आले आहेत. स्मृती मंधानाच्या हळदीला क्रिकेट विश्वातील अनेक खेळाडूंनी उपस्थिती दर्शवलीय हळदीच्या फोटोंमध्ये स्मृती अतिशय आनंदी आणि पारंपरिक लूकमध्ये दिसत आहे. स्मृतीचे हळदीचे सुंदर फोटो आणि व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
पलाश मुच्छलने स्मृती मंधानाला कुठे केला होता प्रपोज?
याच दरम्यान पलाशनेही एक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.या व्हिडीओत पाहू शकता की, स्मृतीच्या डोळ्यांवर कपडा बांधून तिला डी वाय पाटील स्टेडियममध्ये नेण्यात येतं. त्यानंतर स्मृती डोळ्यांवरील पट्टी हटवते, तेव्हा पलाश घुडग्यावर बसून स्मृतीला प्रपोज करतो. त्यावेळी पलशच्या हातात गुलाबाच्या फुलांचा गुच्छ असतो आणि एक डायमंड रिंगही असते. हे पाहून स्मृती भावनिक होते आणि तिच्या आनंदाला पारावरच उरत नाही.
नक्की वाचा >> मुलींना कोणत्या टाईपचा मुलगा आवडतो? दाढीवाला, रोमॅन्टिक की बॉडी बिल्डर? हॉस्टेलच्या पोरींचा 'तो' Video व्हायरल
इथे पाहा स्मृती मंधानाच्या हळदी समारंभाचा जबरदस्त व्हिडीओ
व्हिडीओच्या शेवटी पलाश स्मृतीच्या बोटामध्ये रिंग घालतो. दोघेही आकर्षक रिंग कॅमेरासमोर दाखवतात. हा रोमॅन्टिक व्हिडीओ इंटरनेटवर वेगाने व्हायरल झाला आहे. चाहत्यांनी या सुंदर क्षणाला ड्रीम प्रपोजल म्हटलं आहे.
नक्की वाचा >> Alcohol Precautions : दारू प्यायल्यानंतर उल्टी होते? 'या' गोष्टी लगेच करा, टल्ली झाल्यावरही नशा झटपट उतरेल!
भारताला महिला वर्ल्डकप जिंकवून देण्यात स्मृती मंधानाचा सिंहाचा वाटा आहे. पलाशनेही स्मृतीच्या यशाबद्दल अनेक पोस्ट शेअर करत तिला भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत. विशेष म्हणजे स्मृतीच्या ‘SM18' या टॅटूचीही जोरदार चर्चा रंगली. लग्नाआधी समोर आलेले हे फोटो आणि व्हिडीओ पाहून चाहत्यांनी या कपलला लग्नाच्या खूप साऱ्या शुभेच्छा दिल्या आहेत.