जाहिरात

मुलींना कोणत्या टाईपचा मुलगा आवडतो? दाढीवाला, रोमॅन्टिक की बॉडी बिल्डर? हॉस्टेलच्या पोरींचा 'तो' Video व्हायरल

मुली कोणत्या मुलांना जास्त पसंत करतात? हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या मुलींनी व्हिडीओ बनवून सगळंच सांगितलं..

मुलींना कोणत्या टाईपचा मुलगा आवडतो? दाढीवाला, रोमॅन्टिक की बॉडी बिल्डर? हॉस्टेलच्या पोरींचा 'तो' Video व्हायरल
Hostel Girls Viral News
मुंबई:

Hostel Girls Viral Video: दररोज सोशल मीडियावर अनेक मजेशीर व्हिडीओ व्हायरल होत असतात. जेन-झी (Gen-Z) च्या या जमान्यात तरुण पिढी काय करेल, याचा काही नेम राहिला नाहीय. मुलींना इम्प्रेस करण्यासाठी मुलं अनेक प्रकारचे प्रयोग करतात, असं म्हटलं जातं. पण मुलींच्या मनात प्रेमाची झलक तयार होण्यासाठी त्यांना नेमका कशा टाईपचा मुलगा आवडतो? असा प्रश्न अनेकांना पडतो. मुलांची लाईफस्टाईल पाहून काही मुली त्यांच्या प्रेमात पडतात, असे काही लव्हगुरु सांगतात. दाढी असलेली मुलं,रोमॅन्टिक मुलं, बॉडी बिल्डर की श्रीमंत मुलगा? मुली नक्की कोणाला पसंती देतात? याचं उत्तर एका हॉस्टेलच्या मुलींनी व्हिडीओ बनवून देण्याचा प्रयत्न केला आहे. हॉस्टेलच्या मुलींच्या हा व्हिडीओ इंटरनेटवर तुफान व्हायरल झाला असून लोकांनी प्रतिक्रियांचा वर्षाव केला आहे.

हॉस्टेलच्या गॅलरीत मुलींनी असं काही केलं..

हॉस्टेलच्या मुलींचा हा व्हिडीओ @jyoti_Saini_0604 नावाच्या यूजरने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडीओ पाहू शकता की, हॉस्टेलच्या गॅलरीत आठ मुली एका रांगेत उभ्या असतात. जी व्यक्ती त्यांचा व्हिडीओ शूट करते, ती त्या मुलींना विचारते की, तुम्हाला कशाप्रकारचा मुलगा आवडतो?, बॉडी बिल्डर मुलगा असं विचारल्यावर काही मुली कॅमेरासमोर धावत जातात. दाढीवाला मुलगा म्हटलं की,ज्यांना अशा टाईपचा मुलगा आवडतो त्या मुली आनंदाने पुढे धावतात. तसच रोमॅन्टिक मुलगा म्हटल्यावरही काही मुलींच्या आनंदाचा पारावरच उरत नाही. जी मुलं फनी असतात, अशाही मुलांना काही मुली पसंत करतात, असं काही मुलींनी या व्हिडीओच्या माध्यमातून म्हटलं आहे. 

इथे पाहा हॉस्टेलच्या मुलींचा तो व्हायरल व्हिडीओ

इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ शेअर केल्यापासून आतापर्यंत या व्हिडीओला 80 हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. सध्याच्या डिजिटल युगात काही जण रिल्स बनवून प्रकाशझोतात येण्यासाठी नको ते उद्योग करतात.हॉस्टेलच्या मुलींनीही फावळ्या वेळात आपल्या पसंतीच्या मुलांसाठी अशाप्रकारचा व्हिडीओ बनवला असावा, असं काही नेटकऱ्यांचं म्हणणं आहे. मुलींना कोणत्या टाईपचा किंवा स्वभावाचा मुलगा आवडतो?असा प्रश्न अनेक मुलांना पडतो.या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न या हॉस्टेलच्या मुलींनी व्हिडीओच्या माध्यमातून केला आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com