जाहिरात

Alcohol Precautions : दारू प्यायल्यानंतर उल्टी होते? 'या' गोष्टी लगेच करा, टल्ली झाल्यावरही नशा झटपट उतरेल!

अनेक लोकांना दररोज दारू पिण्याचं व्यसन असतं. पण दारूचं अतिप्रमाणात सेवन झाल्यास शरीरात काय मोठे बदल होतात? जाणून घ्या सविस्तर माहिती

Alcohol Precautions : दारू प्यायल्यानंतर उल्टी होते? 'या' गोष्टी लगेच करा, टल्ली झाल्यावरही नशा झटपट उतरेल!
Drinking Alcohol Safety
मुंबई:

Drinking Safety Precautions : अनेक लोकांना दररोज दारू पिण्याचं व्यसन असतं. आजच्या जमान्यात दारूचं व्यसन करणं ही एख सामान्य गोष्ट बनली आहे.कोणाच्या बर्थडे पार्टीला, लग्न असो किंवा एखादा मोठा इव्हेंट असो, प्रत्येक सेलिब्रेशनमध्ये काही लोक दारूचं सेवन नक्कीच करतात. तर काहींना दररोज दारूचे पेग मारण्याची वाईट सवयही असते. खरंतर, दारू पिणे हे आरोग्यासाठी धोकादायकच असतं. असं असतानाही काही लोक खूप जास्त प्रमाणात दारू पितात. तर काही लोकांना दारू पिण्याची सवय नसते, त्यांनी अचानक दारू पिल्यास त्यांना उल्टीच्या त्रासाला सामोरं जावं लागतं. त्यामुळे आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होतात. यामागे नेमकं कारण काय आहे आणि दारू प्यायल्यानंतर उल्टी झाल्यास काय केलं पाहिजे? याबाबत जाणून घेऊयात सविस्तर माहिती. 

दारू प्यायल्यानंतर उल्टी का होते?

जेव्हा कोणी दारूचं सेवन करतो, तेव्हा शरीरात अॅसिटॅल्डिहाईडचं प्रमाण वाढतं. यामुळे लिव्हरमध्ये दारूची पचनक्रिया मंदावते. त्यामुळे उल्टीच्या माध्यमातून ते द्रव्य बाहेर पडते. जेव्हा जास्त प्रमाणात दारूचं सेवन करता, तेव्हा तुमच्या शरीरासाठी हे उपयुक्त ठरत नाही. शरीरात पचनक्रियेत बिघाड होतो आणि काही वेळात उल्टीची समस्या उद्भवते. 

नक्की वाचा >> Snake Bite First Aid: साप चावल्यावर सर्वात आधी काय करावं? 'हा' सोपा उपाय करायला अजिबात विसरू नका!

दारू पिऊन टल्ली झाल्यावर काय करावं? काय असतात याची लक्षणे?

1) उल्टी होणे
2) डोकेदु:खी
3) डोकं जड होणं
4) पोटदु:खी
5) झोप कमी येणे
6) हृदयाचे ठोके वाढणे
7) तोंड कोरडं पडणे
8) खूप तहान लागले
9) अशक्तपणा
10) चिडचिडेपणा

नक्की वाचा >> Cars In India: हायब्रिड आणि इलेक्ट्रिक कारमध्ये नेमका फरक काय? कार खरेदी करण्याआधीच जाणून घ्या सर्व डिटेल्स

काय उपाय कराल?

पाणी पिणे

दारूची नशा वाढल्यावर उल्टी होत असेल, तर तुम्ही हळूहळू पाणी प्या. छोट्या छोट्या सिपमध्ये याचं सेवन करा आणि शरीरा हायड्रेट ठेवा. कारण दारूच्या सेवनामुळे शरीर डिहायड्रेट होतं. अशा परिस्थितीत हळूहळू पाणी प्याल्याने तुमची नशा कमी होते. 

विश्रांती घ्या

दारू प्यायल्यानंतर उल्टी आणि हँगओव्हर झाल्यानंतर आराम करा. कारण तुमचं शरीर थकतं आणि कमकुवत होतं. यामुळे शरीराला विश्रांती द्या.

काय खावे? 

उल्टी झाल्यानंतर खाण्याची इच्छा होत नाही. पण तुम्ही ही चूक करू नका. तुम्ही हलक्या पदार्थांचं सेवन करा. लिंबू पाणी प्या. टोस्टसारखे लाईट पदार्थ आणि फळांचंही सेवन करू शकता. 

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com