Suryakumar Yadav Come Back In Team India : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सूर्यकुमार यादवसाठी टीम इंडियाचे दरवाजे बंद झाले नाहीत. सूर्या सध्याच्या प्लॅनमध्ये जरी फिट बसत नसेल,पण त्याने चांगली कामगिरी केली तर त्याचं संघात पुनरागमन होऊ शकतं.सूर्यकमारच्या नेतृत्त्वात टीम इंडियाने आयसीसीसी टी-20 वर्ल्डकप 2026 ची ट्रॉफी जिंकली होती.
परंतु, मागील एक वर्षांपासून सूर्यकुमार आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये धावांसाठी संघर्ष करत आहे.सूर्याला आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्याआधी कर्णधारपदावरून हटवण्यात आलं होतं.तसच त्याला टीममध्येही समाविष्ट केलं नव्हतं.त्यानंतर मिडिया रिपोर्ट्समध्ये स्पष्ट झालं की,आयपीएल 2026 दरम्यान निवडकर्त्यांची नजर सूर्यावर होती.पण त्याला आयपीएलमध्येही धावांचा सूर गवसला नाही.
नक्की वाचा >> Maharashtra Rain : पाच-सहा दिवस वाट बघा..सलग 9 दिवस महाराष्ट्रात बरसणार मुसळधार पाऊस, IMD चा मोठा अलर्ट
भारताला व्हाईट वॉशचा सामना करावा लागला
निवडकर्त्यांनी आयपीएलमध्ये पंजाब किंग्जचा कर्णधार श्रेयस अय्यरला सूर्याच्या जागेवर टीम इंडियाची कमान सोपवली होती. पण अय्यरच्या कॅप्टन्सीत टीम इंडियाने आतापर्यंत सुमार कामगिरी केली आहे.पहिले आर्यलँड आणि आता इंग्लंडविरोधात भारताला व्हाईट वॉशचा सामना करावा लागला. टीम इंडियाचा सलग सहा सामन्यांमध्ये पराभव झाला. भारताने 2006 मध्ये पहिला सामना खेळला होता. पण टीम इंडियासोबत असं कधीच झालं नाही.
नक्की वाचा >> Ambarnath News: अंबरनाथ पालिकेच्या समित्यांची निवडणूक बिनविरोध, भाजपला सर्वात जास्त जागा; शिवसेना, NCP चं काय?
न्यूज एजन्सी एएनआयच्या माहितीनुसार, भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डशी संबंधीत एका सूत्राने माहिती दिली की,सूर्याचं टीम इंडियात कमबॅक होऊ शकतं.पण त्याला देशांतर्गत क्रिकेटमध्ये धावांचा पाऊस पाडावा लागेल.रिपोर्टनुसार,सूर्या जरी संघाच्या योजनांमध्ये सामील नसेल,पण त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये अप्रतिम कामगिरी केली,तर त्याच्या निवडीची शक्यता राहील.BCCI सूत्राने म्हटलं की,सूर्यकुमार यादवसाठी दरवाजे अजूनही उघडे आहेत.तो आता संघाच्या योजनांचा भाग नाही.पण त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये धावांचा डोंगर रचला तर त्याचं पुनरागमन होऊ शकतं.