यशपाल सोनकांबळे, प्रतिनिधी
Maharashtra Rain Alert News Today : मागील काही दिवसांपासून राज्यातील बहुतांश भागात पावसाने विश्रांती घेतल्याने उष्ण,दमट आणि कोरडे हवामान अनुभवायला मिळत आहे.जुलै महिन्याच्या सुरुवातीला राज्यभर मुसळधार पावसाने हजेरी लावली होती.मात्र,सध्या मान्सूनची तीव्रता कमी झाली आहे.या पार्श्वभूमीवर भारतीय हवामान विभागाने पावसाचा अंदाज वर्तवला असून 18 ते 25 जुलै दरम्यान मान्सून पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता व्यक्त केली आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार,विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता असून त्या भागासाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.मात्र,कोकण,मुंबई,मध्य महाराष्ट्र,उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रातील बहुतांश भागांत मान्सून पुन्हा सक्रिय होण्यासाठी आणखी पाच ते सहा दिवस प्रतीक्षा करावी लागणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
नक्की वाचा >> Ambarnath News: अंबरनाथ पालिकेच्या समित्यांची निवडणूक बिनविरोध, भाजपला सर्वात जास्त जागा; शिवसेना, NCP चं काय?
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा
सध्या महाराष्ट्रात उष्ण आणि दमट कोरडे वारे वाहत असल्यामुळे पावसाची तीव्रता कमी झाली आहे.त्यामुळे अनेक भागांमध्ये उन्हाचा चटका आणि उकाडा वाढला असून शेतकरीही पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.हवामान विभागाच्या रिपोर्टनुसार,सध्याची परिस्थिती केवळ एल निनोचा परिणाम आहे,असे ठामपणे सांगता येणार नाही.मात्र,अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यास चक्रीय परिस्थिती तयार होऊन मान्सूनला पुन्हा चालना मिळू शकते.
नक्की वाचा >>Ratnagiri News: रात्रीच्या अंधारात शिवनदी पात्रात भयंकर घडलं, रत्नागिरीतील चिपळूणमध्ये खळबळ!
याशिवाय इंडियन ओशन डायपोल (IOD)सध्या सकारात्मक अवस्थेत असून ही परिस्थितीही मान्सूनच्या पुनर्सक्रियतेसाठी अनुकूल मानली जात आहे.येत्या पाच ते सहा दिवसांत वातावरणात आवश्यक बदल झाल्यास राज्यात पावसाचा जोर पुन्हा वाढू शकतो.विशेषतः 18 जुलैनंतर मान्सून पुन्हा सक्रिय होऊन अनेक भागांत पावसाची शक्यता वाढेल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.याबाबत अधिक माहिती भारतीय हवामान विभाग,पुणे येथील हवामानशास्त्रज्ञ डॉ.एस.डी.सानप यांनी दिली.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world