मनोज सातवी, प्रतिनिधी
T20 Cricket World Cup final match : T20 क्रिकेट वर्ल्ड कपचा अंतिम सामना पाहण्यासाठी चाहत्यांची वाढती मागणी आणि क्रिकेटप्रेमींची वाढती गर्दी लक्षात घेऊन पश्चिम रेल्वेने विशेष रेल्वे गाड्या चालवण्याची घोषणा केली आहे. क्रिकेट विश्वचषकाच्या अंतिम सामन्यासाठी मुंबई परिसरातून अहमदाबादकडे जाणाऱ्या चाहत्यांसाठी सुपरफास्ट विशेष गाड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. (T20 Cricket World Cup final match special trains)
चार विशेष एक्सप्रेस गाड्यांची सुविधा
ICC Men's T20 World Cup 2026 चा अंतिम सामना रविवार, ८ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ७ वाजता अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार असून भारत आणि न्यूझीलंड या संघांमध्ये विजेतेपदासाठी लढत रंगणार आहे. या सामन्यासाठी मोठ्या संख्येने क्रिकेटप्रेमी अहमदाबादला जाणार असल्याने पश्चिम रेल्वेने मुंबई सेंट्रल–अहमदाबाद, बांद्रा टर्मिनस–अहमदाबाद, अहमदाबाद–छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि अहमदाबाद–पुणे या मार्गांवर सुपरफास्ट विशेष गाड्या चालवण्याची योजना आखली आहे. उद्या ८ मार्च रोजी सकाळी मुंबई सेंट्रल आणि वांद्रे टर्मिनस येथून अहमदाबादसाठी विशेष ट्रेन सोडण्यात येणार आहे.
एक्सप्रेस गाड्यांचा थांबा कुठे कुठे असेल?
या गाड्यांना बोरीवली, वापी, सूरत, भरूच, वडोदरा, वसई रोड, ठाणे, दादर, कल्याण आणि लोणावळा या महत्त्वाच्या स्थानकांवर थांबे देण्यात आले आहेत. गाड्यांमध्ये वातानुकूलित प्रथम श्रेणी, एसी द्वितीय श्रेणी, एसी तृतीय श्रेणी, स्लीपर आणि सामान्य द्वितीय श्रेणीचे डबे उपलब्ध असतील. या विशेष गाड्यांचे आरक्षण ७ मार्चपासून सर्व आरक्षण केंद्रांवर तसेच IRCTC च्या संकेतस्थळावर सुरू करण्यात आले असून क्रिकेटप्रेमींनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांनी केले आहे.
एक्सप्रेस गाड्यांचं वेळापत्रक...
१ - ट्रेन क्रमांक ०९०२९/०९०३०
वांद्रे टर्मिनस – अहमदाबाद एसी सुपरफास्ट स्पेशल [०२ फेऱ्या]
ट्रेन क्रमांक ०९०२९ वांद्रे टर्मिनस – अहमदाबाद स्पेशल रविवार, ०८ मार्च २०२६ रोजी सकाळी ००:०५ वाजता वांद्रे टर्मिनस येथून निघेल आणि त्याच दिवशी सकाळी ०८:४० वाजता अहमदाबाद येथे पोहोचेल. त्याचप्रमाणे, ट्रेन क्रमांक ०९०३० अहमदाबाद – वांद्रे टर्मिनस स्पेशल सोमवार, ०९ मार्च २०२६ रोजी पहाटे ०३:२० वाजता अहमदाबाद येथून निघेल आणि त्याच दिवशी सकाळी ११:३५ वाजता वांद्रे टर्मिनस येथे पोहोचेल.
या दोन्ही ट्रेन बोरिवली, वापी, सुरत, भरूच आणि वडोदरा स्टेशनवर थांबेल. या ट्रेनमध्ये फर्स्ट एसी, एसी २-टियर आणि एसी ३-टियर कोच असतील.
२ - ट्रेन क्रमांक ०९०४३/०९०४४
वांद्रे टर्मिनस – अहमदाबाद एसी सुपरफास्ट स्पेशल [०२ फेऱ्या]
ट्रेन क्रमांक ०९०४३ वांद्रे टर्मिनस – अहमदाबाद स्पेशल
सोमवार, ०९ मार्च २०२६ रोजी रात्री २:३० वाजता वांद्रे टर्मिनस येथून निघेल आणि त्याच दिवशी सकाळी १०.५५ वाजता अहमदाबाद येथे पोहोचेल. त्याचप्रमाणे, ट्रेन क्रमांक ०९०४४ अहमदाबाद – वांद्रे टर्मिनस स्पेशल सोमवार, ०९ मार्च २०२६ रोजी रात्री ०३:५० वाजता अहमदाबाद येथून निघेल आणि त्याच दिवशी दुपारी १२:१५ वाजता वांद्रे टर्मिनस येथे पोहोचेल. या ट्रेन बोरिवली, वापी, सुरत, भरूच आणि वडोदरा स्थानकांवर थांबेल. या ट्रेनमध्ये एसी ३-टायर कोच असतील.
३ - ट्रेन क्रमांक ०११५४/०११५३
अहमदाबाद-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस सुपरफास्ट एसी स्पेशल [०२ फेऱ्या]
ट्रेन क्रमांक ०११५४ अहमदाबाद-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्पेशल
सोमवार, ०९ मार्च २०२६ रोजी अहमदाबादहून पहाटे ०४:०० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी १२:५५ वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे पोहोचेल. वडोदरा, सुरत, वसई रोड, ठाणे आणि दादर स्थानकांवर थांबा असेल. या ट्रेनमध्ये एसी ३-टायर (इकॉनॉमी) कोच असतील.
४ ट्रेन क्रमांक ०१४१८/०१४१७
अहमदाबाद - पुणे सुपरफास्ट स्पेशल [०२ फेऱ्या]
ट्रेन क्रमांक ०१४१८ अहमदाबाद - पुणे स्पेशल
सोमवार, ०९ मार्च २०२६ रोजी अहमदाबादहून पहाटे ०२:०० वाजता निघेल आणि त्याच दिवशी दुपारी १२:१० वाजता पुण्यात पोहोचेल. वडोदरा, सुरत, वसई रोड, कल्याण आणि लोणावळा स्थानकांवर थांबा असेल. या ट्रेनमध्ये एसी २-टियर, एसी ३-टियर, स्लीपर क्लास आणि जनरल सेकंड क्लास डबे असतील.
०९०२९, ०९०३०, ०९०४३, ०९०४४, ०११५४ आणि ०१४१८ या गाड्या क्रमांकांसाठी बुकिंग ७ मार्चपासून सर्व पीआरएस काउंटरवर आणि आयआरसीटीसी वेबसाइटवर सुरू झालं आहे. ट्रेन थांबे, वेळा आणि कोच रचना याबद्दल तपशीलवार माहितीसाठी, प्रवासी कृपया www.enquiry.indianrail.gov.in या संकेतस्थळाला भेट देऊ शकता.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world