New Zealand cricket team video goes viral : अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये भारतीय टीमने अभूतपूर्व यश मिळवलं. भारताने न्यूझीलँडला 256 धावांचं तगडं आव्हान दिलं होतं. न्यूझीलंडचा संघ 19 षटकात 159 धावांवर गारद झाला आणि भारताने टी-20 वर्ल्डकप 2026 चं जेतेपद मिळवलं. भारतीय संघाच्या या यशानंतर देशभरात उत्साहाचं वातावरण आहे. चाहते विविध प्रकारे भारताचा विजय साजरा करीत आहेत. या विजयाचा सर्वात मोठा हिरो ठरला तो म्हणजे विकेटकीपर बॅटर संजू सॅमसन. सुरुवातीला संजूला प्लेइंग इलेव्हनमध्ये फारशी संधी मिळाली नव्हती, पण सुपर 8 मध्ये पुनरागमन करताच त्याने भारतीय टीमचं नशीबच बदलून टाकलं.
न्यूझीलँडच्या खिलाडू वृत्तीचं होतंय कौतुक....
सामना संपल्याच्या काही मिनिटात सोशल मीडियावर टीम इंडियाचं कौतुक करणारे व्हिडिओ-पोस्ट व्हायरल होऊ लागले. यादरम्यान न्यूझीलँड टीमचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओतून न्यूझीलँड टीमचं कौतुक केलं जात आहे. या व्हिडिओतून न्यूझीलँडच्या स्पोर्ट्समनशीपचं कौतुक केलं जातं. हा व्हिडिओ न्यूझीलँडच्या अंडर-१९ टीमचा आहे. न्यूझीलँड आणि वेस्ट इंडिजच्या टीममधीन सामन्यादरम्यानचा हा व्हिडिओ आहे.
या सामन्यात वेस्ट इंडिजचा Kirk McKenzie जखमी झाला होता. त्याच्या पायाला क्रॅम्प आला होता. त्याला चालताही येत नव्हतं. अशावेळी न्यूझीलँडच्या टीममधील दोघांनी त्याला अक्षरश: उचलून मैदानाबाहेर नेलं. हा व्हिडिओ पाहून न्यूझीलँडच्या टीमचं कौतुक केलं जात आहे. या व्हिडिओवर अनेक कमेंट्स येत आहेत. ज्यामध्ये न्यूझीलँड टीमच्या खेळाडू वृत्तीचं कौतुक केलं जात आहे.
हा व्हिडिओ motivone.in नावाच्या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ काही दिवसांपूर्वी पोस्ट करण्यात आला आहे. हा सामना कधी झाला हे कळू शकलेलं नाही. मात्र भारताने न्यूझीलँडविरुद्धचा सामना जिंकल्यानंतर हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.