Team India T20i World Cup 2026 Semi Final Opponent: वेस्ट इंडिजच्या संघाचा ५ विकेट्सने दणदणीत पराभव करुन भारतीय संघाने टी ट्वेंटी विश्वचषकाच्या सेमीफायनलमध्ये धडक मारली आहे. संजू सॅमसनच्या नाबाद ९७ धावांच्या मॅचविनर खेळीने टीम इंडियाचा विजयाचा मार्ग सोपा झाला. कोलकाताच्या ईडन गार्डन मैदानावर रंगलेला हा सामना शेवटच्या षटकापर्यंत रंगला. टीम इंडियाच्या विजयासोबतच सेमी फायनलमध्ये कोण कुणाशी भिडणार? याचे चित्र आता स्पष्ट झाले आहे.
टी ट्वेंटी विश्वचषकाचे सेमीफायनलचे चित्र स्पष्ट!
भारत आणि वेस्ट इंडिजमधील सामना संपल्यानंतर २०२६ च्या टी२० विश्वचषकाच्या सेमीफायनलमध्ये कोणते चार संघ खेळणार याचे चित्र स्पष्ट झाले आहे.. रविवारी, कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर भारतीय संघाने वेस्ट इंडिजवर ५ विकेटने ऐतिहासिक विजय मिळवला. संजू सॅमसनने ९७ धावांची संस्मरणीय खेळी खेळली आणि टीम इंडियाला सेमीफायनलमध्ये पोहोचवले. सेमीफायनलमध्ये पात्र ठरणारा भारत हा चौथा देश आहे.
भारतापूर्वी, दक्षिण आफ्रिका, इंग्लंड आणि न्यूझीलंडने आधीच त्यांचे उपांत्य फेरीतील स्थान निश्चित केले होते. भारत आणि दक्षिण आफ्रिका सुपर ८ च्या पहिल्या गटातून पात्र ठरले, तर इंग्लंड आणि न्यूझीलंड दुसऱ्या गटातून पात्र ठरले. दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंडने आपापल्या गटात अव्वल स्थान मिळवून उपांत्य फेरीतील स्थान निश्चित केले. टीम इंडियाने वेस्ट इंडिजचा ५ विकेटने पराभव केला. पाकिस्तानने सुपर ८ सामन्यात श्रीलंकेला ६५ किंवा त्याहून अधिक धावांनी हरवल्यानंतर न्यूझीलंडचा अंतिम चारमध्ये प्रवेश झाला.
कोण कुणाशी भिडणार?
२०२६ च्या टी-२० विश्वचषकाचा पहिला उपांत्य सामना दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड यांच्यात ४ मार्च रोजी कोलकाता येथील ईडन गार्डन्स येथे खेळला जाईल. दुसरा उपांत्य सामना भारत आणि इंग्लंड यांच्यात ५ मार्च रोजी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळला जाईल. दोन्ही उपांत्य सामन्यातील विजेते ८ मार्च रोजी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर अंतिम फेरीत भिडतील. भारताला इतिहास रचण्याची संधी असेल, कारण कोणत्याही संघाने आतापर्यंत सलग दोन टी-२० विश्वचषक जिंकलेले नाहीत.
Rohit Sharma VIDEO: 'अरे मुंबईत राहतो..', रोहित शर्मा मराठीत बोलला; 'हास्यजत्रा'चे कलाकार भारावले
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world