जाहिरात

Cricket News: टीम इंडियाचा टी-20 कॅप्टन बदलणार! सूर्याच्या जागी 'हे' 3 खेळाडू शर्यतीत, BCCI चा नवा प्लॅन

2028 मध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेत क्रिकेटचा समावेश करण्यात आला आहे. त्यासोबतच टी-20 विश्वचषकही होणार आहे.

Cricket News: टीम इंडियाचा टी-20 कॅप्टन बदलणार! सूर्याच्या जागी 'हे' 3 खेळाडू शर्यतीत, BCCI चा नवा प्लॅन
  • भारतीय संघाने सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली २०२६ चा टी-२० विश्वचषक जिंकून महत्त्वाची कामगिरी केली आहे
  • बीसीसीआयने आगामी काळासाठी तिन्ही फॉरमॅटसाठी एकच कर्णधार नियुक्त करण्याचा विचार सुरू केला आहे
  • शुबमन गिल सध्या कसोटी आणि वनडे संघाचा कर्णधार असून टी-२० संघात स्थान मिळवण्याचा प्रयत्न करत आहे
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.

भारतीय संघाने सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली 2026 चा टी-20 विश्वचषक जिंकून इतिहास रचला आहे. असं असलं,तरी आता संघात मोठ्या बदलांचे संकेत मिळत आहेत. 2028 चा टी-20 विश्वचषक आणि ऑलिम्पिकमधील क्रिकेटचा समावेश लक्षात घेता, बीसीसीआयने आतापासूनच नव्या नेतृत्वाचा शोध सुरू केला आहे. सूर्यकुमार यादव सध्या 35 वर्षांचा आहे. वाढत्या वयामुळे पुढच्या विश्वचषकापर्यंत त्याच्याकडे नेतृत्व असण्याची शक्यता कमी आहे. मात्र, तो संघात फलंदाज म्हणून कायम राहणार असल्याचे समजते. त्याच्या जागेवर तीन नावांची सध्या चर्चा सुरू आहे.

बीसीसीआय सध्या तिन्ही फॉरमॅटसाठी एकच कर्णधार असावा, या विचारात आहे. सध्या कसोटी आणि वनडे संघाचे नेतृत्व शुबमन गिल करत आहे. त्याचेच नाव सध्या टी-20 कॅप्टनच्या शर्यतीत सर्वात पुढे आहे. मात्र, गिलला टी-20 संघात आपली जागा पक्की करावी लागेल. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत त्याला संधी मिळाली होती. पण कामगिरीत सातत्य नसल्याने त्याला 2026 च्या विश्वचषक संघात स्थान मिळाले नव्हते. आता आगामी आयपीएलमध्ये गुजरात टायटन्ससाठी त्याने केलेली कामगिरी त्याच्या पुनरागमनाचा मार्ग ठरवेल.

नक्की वाचा- Rohit Sharma Video: भर मैदानात रोहित शर्मा बायकोवर खेकसला, दोघांची हमरी-तुमरी कॅमेऱ्यात कैद, Video Viral

जर शुबमन गिल अपेक्षित कामगिरी करू शकला नाही, तर अनुभवी हार्दिक पांड्याकडे टी-20 चे नेतृत्व सोपवले जाऊ शकते. हार्दिककडे या फॉरमॅटचा मोठा अनुभव असून त्याने यापूर्वीही यशस्वी नेतृत्व केले आहे. सूर्यकुमार यादवनंतर संघाची धुरा कोणाकडे जाणार, याचे चित्र आयपीएल 2026 संपल्यानंतरच स्पष्ट होणार आहे. हार्दिकच्या नावाची चर्चा होत असताना तिसरे नाही हे श्रेयस अय्यरचे आहे. तो ही टी-20 साठी परफेक्ट कॅप्टन समजला जातोय. त्यामुळे तो संघात परत आल्यास कॅप्टन म्हणूनच येईल अशी चर्चा आहे.   

नक्की वाचा - भारतीय टीमने जिंकला सामना, मात्र न्यूझीलँडच्या टीमचं कौतुक; Video सोशल मीडियावर तुफान व्हायरल

2028 मध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेत क्रिकेटचा समावेश करण्यात आला आहे. त्यासोबतच टी-20 विश्वचषकही होणार आहे. या मोठ्या स्पर्धांसाठी भारताला एका दीर्घकालीन कर्णधाराची गरज आहे. बीसीसीआयचे निवडकर्ते आता तरुण रक्ताला संधी देऊन संघ बांधणीवर भर देत आहेत. नव्या दमाच्या खेळाडूंना संधी देण्यासावर भर असेल. त्यांना संधी देवून आंतरराष्ट्रीय स्तरावर तयार केले जाणार आहे.  

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com