Suryakumar Yadav's is likely to remove as captain: आर्यलँड आणि इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय टी-20 संघाच्या स्क्वॉडची घोषणा येत्या काही दिवसांत करण्यात येईल.अशातच भारताच्या टी-20 संघ्याच्या नव्या कर्णधारपदाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. अजित आगरकर एंड कंपनीने टी-20 विश्वकप विजेता कर्णधार सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) ची टी-20 संघाच्या कर्णधारपदावरून हकालपट्टी करण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे सूर्यकुमारच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट करिअरचा द एंड झाल्याच्या चर्चा सोशल मीडियावर रंगल्या आहेत.
लवकरच नव्या टी-20 कर्णधाराची घोषणा
या दौऱ्यांसाठी भारताच्या नव्या कर्णधाराची घोषणा केली जाईल. गतवर्षापासून सूर्यकुमार यादवबाबत अनेक चर्चा रंगल्या होत्या. टीम इंडिया जिंकत होती, पण सूर्यकुमार यादवचा फॉर्मबाबत सतत संघर्ष सुरू होता. गेल्या वर्षी सूर्यकुमारची अत्यंत खराब फॉर्म होता. त्याने 21 इनिंगमध्ये 15 च्या सरासरीनेही धावा केल्या नाहीत.
नक्की वाचा >> Pune News: पुण्यात मुसळधार पाऊस, 'या' महामार्गावर पाणी साचल्याने वाहतूक विस्कळीत, Video होतोय व्हायरल
त्यामुळे सूर्यकुमारच्या फॉर्मबाबत उलटसुलट चर्चा रंगल्या होत्या. सूर्यकुमारला भारताचं कर्णधार ठेवायचं की नाही,याबाबतही चर्चा सुरु होत्या.इंडियन एक्स्प्रेसला बीसीसीआयच्या एका टॉप अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, भारतीय क्रिकेट बोर्डाने आता टी-20 संघाच्या भविष्याचा विचार करून नव्या कर्णधाराबाबत विचार सुरु केला आहे. टीम मॅनेजमेंट आणि निवड समितीने चर्चा केल्यानंतर लवकरच नव्या टी-20 कर्णधाराची घोषणा केली जाईल.
नक्की वाचा >> Kalyan News: सिद्धेश्वर एक्स्प्रेस चोरी प्रकरण, खतरनाक चोरट्याला पकडलं, 1.27 कोटींची सोन्याची बिस्कीटे जप्त
बीसीसीआयच्या वरीष्ठ अधिकाऱ्याने इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना म्हटलं की, निवड समिती आणि टीम मॅनेजमेंटने कोच गौतंम गंभीरसोबत चर्चा केल्यानंतर टीम इंडियाला (T-20) मध्ये नव्या कर्णधाराला संधी देण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे.बोर्ड अधिकाऱ्यांनी असंही म्हटलंय की,सूर्याच्या कॅप्टन्सीत भारतीय संघाने टी-20 वर्ल्डकप जिंकलं होतं. पण त्याचा वैयक्तिक फॉर्म आणि भविष्याचा विचार करता,हा निर्णय घेण्यात आला आहे.तसच संघातही निवडीबाबत विचार केला जाणार नाही.या निर्णयाबाबत लवकरच सूर्यकुमारला सांगितलं जाईल.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world