India vs USA World Cup Match : भारत आणि अमेरिका यांच्या टी-20 वर्ल्डकपचा पहिला सामना वानखेडे स्टेडियममध्ये रंगत आहे. भारताने प्रथम फलंदाजी करून 20 षटकांमध्ये 9 विकेट्स गमावून 161 धावा केल्या होत्या. कारण अमेरिकेचा वेगवान गोलंदाज शॅडली वॅन शाल्कविकने भारताचे स्टार फलंदाज स्वस्तात पॅव्हेलियनमध्ये पाठवले. भारताचे टॉप ऑर्डरचे फलंदाज वानखेडे मैदानात धावांचा पाऊस पाडतील अशी अपेक्षा भारतीय चाहत्यांना होती. पंरतु, शॅडलीच्या भेदक गोलंदाजीपुढे भारताच्या फलंदाजांनी नांगी टाकली. अमेरिकेच्या सुरुवातीच्या सहा ओव्हर्समध्ये त्याने एकट्याने तीन षटकांची गोलंदाजी केली. यावेळी त्याने 4.33 च्या इकोनॉमीने 13 धावा देऊन तीन विकेट्स घेतल्या. शॅडलीने इशान किशन (20),तिलक वर्मा (25)आणि शिवम दुबेला अवघ्या एका धावेवर बाद केलं.
कोण आहे शॅडली वॅन शाल्कविक?
भारताचे स्टार फलंदाज बाद करणाऱ्या शॅडलीची संपूर्ण क्रिकेट विश्वात चर्चा रंगली आहे. अशातच शॅडली बाबत जाणून घेऊयात सविस्तर माहिती. शॅडलीचा जन्म 5 ऑगस्ट 1988 मध्ये दक्षिण आफ्रिकेच्या केप टाऊन शहरात झाला होता. सध्याच्या घडीला तो 37 वर्ष आणि 186 दिवसांचा आहे. शॅडली अमेरिका संघात अष्टपैलू खेळाडू म्हणून खेळतो. तो डावखुरा फलंदाज असून मध्यम गतीने गोलंदाजी करतो. तसच तो मेजर लीग क्रिकेटमध्ये लॉस एंजिल्स नाईट रायडर्ससाठी खेळतो.
🚨 MEET USA SHADLEY VAN SCHALKWYK: THE INDIAN LINEUP DESTROYER 🚨
— Sam (@Cricsam01) February 7, 2026
Schalkwyk in current match vs India:
4 Overs - 16 Runs - 3 Wickets (Kishan, Tilak, Surya)
— Ripped through India's top order at Wankhede! 🥶
Pure dominance, levels above the rest. 🤯 pic.twitter.com/sxrgxAAyMu
नक्की वाचा >> स्मृती मंधानाच्या आईनं पलाश मुच्छलला Instagram वर डिवचलं, काही वेळात पोस्ट डिलिट केली, पण स्क्रिनशॉट व्हायरल
शॅडलीने देशांतर्गत क्रिकेटची सुरुवात दक्षिण आफ्रिके विरोधात केली. या सामन्यांमध्ये त्याने मध्यम गतीची गोलंदाजी केली. परंतु, त्याला या सामन्यांमध्ये यश मिळालं नाही. फेब्रुवारी 2008 मध्ये प्रथम श्रेणी सामन्यात त्याने उल्लेखनीय कामगिरी केली नाही. त्यामुळे त्याला संघातून ड्रॉप करण्यात आलं. दरम्यान, शाल्कविकने भारता विरोधात झालेल्या सामन्यात चार ओव्हर्समध्ये 6.25 च्या इकोनॉमीने 25 धावा करत चार विकेट्स घेतल्या. त्याने इशान किशन, तिलक वर्मा, शिवम दुबे आणि अर्शदीप सिंगला बाद केलं.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world