- वैभव सूर्यवंशीच्या यशानंतर त्याचा लहान भाऊ आशीर्वाद सूर्यवंशी क्रिकेट विश्वात चर्चेत आहे
- संजीव सूर्यवंशी म्हणाले की आशीर्वादमध्ये चांगली क्रिकेट क्षमता आहे
- आशीर्वाद हा आक्रमक फलंदाज असून त्याला योग्य मार्गदर्शन मिळाल्यास पुढील दोन वर्षांत तो वेगळी ओळख निर्माण करेल
Vaibhav Sooryavanshi Exclusive: क्रिकेट विश्वात आपल्या फलंदाजीने वैभव सुर्यवंशीने खळबळबळ उडवून दिली आहे. या युवा फलंदाजाने आपल्या कामगिरीची दखल सर्वांनाच घ्यायला लावली आहे. सध्या क्रिकेट जगतात त्याचीच चर्चा सुरू आहे. ही चर्चा सुरू असताना सुर्यवंशी कुटुंबातील आणखी एकाने ही सर्वांचे लक्ष वेधले आहे. ते म्हणजे वैभव सूर्यवंशीचा छोटा भाऊ आशीर्वाद सूर्यवंशी याने. त्याच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे. आशीर्वाद देखील मोठ्या भावासारखाच आक्रमक फलंदाज आहे का? तो भविष्यात मोठ्या स्पर्धा खेळताना दिसेल का? असा प्रश्न क्रिकेट चाहत्यांना पडला आहे. यावर वैभवचे वडील आणि त्याचे प्रशिक्षक संजीव सूर्यवंशी यांनी एका मुलाखतीत सविस्तर भूमिका मांडली आहे.
वैभवचे वडील संजीव सूर्यवंशी यांच्या मते, आशीर्वादमध्ये चांगले क्रिकेट खेळण्याची क्षमता आहे. तो प्रचंड मेहनत घेत आहे. मात्र, वैभव सूर्यवंशीची तुलना कोणाशीही होऊ शकत नाही असं त्यांनी स्पष्ट केलं. वैभव हा एकमेव आहे. त्याच्या सारखं दुसरं कोणी नाही. त्यांच्या मते , "वैभवची गोष्ट वेगळी आहे. आशीर्वाद देखील चांगला खेळतो असं त्यांनी सांगितलं. पण सध्या आपले संपूर्ण लक्ष वैभवच्या क्रिकेटवर आहे. या कारणामुळे आपण आशीर्वादला तितका वेळ देऊ शकत नाही हे सांगायला ते विसरले नाहीत. तरीही तो सातत्याने सराव करत आहे. शिवाय त्याची कामगिरी ही चांगली असल्याचं त्यांनी सांगितलं.
संजीव हे आशीर्वाद बाबत ही भरभरून बोलले. आशीर्वाद हा उजव्या हाताचा फलंदाज आहे. त्याची फलंदाजी देखील वैभवसारखीच आक्रमक आहे असं ही संजीव यांनी स्पष्ट केलं. त्याच्यात मैदानावर मोठे फटके खेळण्याची क्षमता आहे. सर्वात खास म्हणजे त्याच्यात कमालीचा आत्मविश्वास आहे. संजीव सूर्यवंशी यांनी विश्वास व्यक्त केला की, जर आशीर्वादला योग्य मार्गदर्शन, पुरेसा वेळ मिळाला, तर पुढील 2 वर्षांत तो आपली स्वतंत्र ओळख निर्माण करेल. पण वैभवबाबत ते म्हणाले की तो एकमेव आहे. त्याची मेहनत त्याला वेगळे असल्याचं दर्शवते. पण आशीर्वाद देखील लवकरच क्रिकेटच्या मैदानावर आपली छाप पाडेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
क्रिकेटच्या मैदानावर आपल्या बॅटने धावांचा पाऊस पाडणाऱ्या वैभव सूर्यवंशीच्या यशानंतर आता त्याच्या घरातून आणखी एक क्रिकेटपटू पुढे येत आहे. त्याची ही चर्चा सर्वत्र होत आहे. वैभवचा लहान भाऊ आशीर्वाद सूर्यवंशी याच्या टॅलेंटबद्दल आता उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. तो देखील भावासारखाच टीम इंडियात धमाका करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यावर त्यांचे वडील संजीव सूर्यवंशी यांनी मनातील भावना बोलून दाखवल्या आहेत.