जाहिरात

Team india announced: सूर्या आऊट, श्रेयस इन! टीम इंडियाच्या टी 20 संघात 'या' खेळाडूची सरप्राईज एन्ट्री

या संघात तिलक वर्माकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

Team india announced: सूर्या आऊट, श्रेयस इन! टीम इंडियाच्या टी 20 संघात 'या' खेळाडूची सरप्राईज एन्ट्री

इंग्लंड आणि आयर्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाच्या टी 20 संघाची घोषणा करण्यात आली आहे. संघाचा कॅप्टन म्हणून श्रेयस अय्यरवर जबाबदारी देण्यात आली आहे. त्याच वेळी सुर्याला मात्र या संघात स्थान मिळू शकले नाही. असं असलं तरी संघातील एका खेळाडूच्या एन्ट्रीने सर्वांनाच आश्चर्याचा सुखद धक्का दिला आहे. या खेळाडूची टी इंडियात सरप्राईज एन्ट्री झाली आहे. हा खेळाडू म्हणजे नुकतीच आयपीएल गाजवणार वैभव सुर्यवंशी आहे. त्याला या निमित्ताने टीम इंडियात खेळण्याची संधी मिळाली आहे. टीम इंडिया इंग्लंड आणि आयर्लंड विरुद्ध टी 20 सामने खेळणार आहे. 

अपेक्षे प्रमाणे श्रेयस अय्यरची कर्णधार म्हणून निवड करण्यात आली आहे. तर सूर्याचा संघात समावेश करण्यात आलेला नाही. आयर्लंड आणि इंग्लंडमधील सामन्यासाठी या संघाची निवड करण्यात आली आहे.आयर्लंडसाठी टीम इंडियात श्रेयस अय्यर, अभिषेक शर्मा, संजू सॅमसन, इशान किशन, शिवम दुबे, तिलक वर्मा(VC), नितीश रेड्डी, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, वरुण चक्रवर्ती, रवी बिश्णोई, मो. शिराज, राणा, अर्शदीप सिंग, प्रिन्स यादव आणि वैभव सुर्यवंशी अशी संघाची निवड करण्यात आली आहे. या संघात तिलक वर्माकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. 

नक्की वाचा - रोहित-विराटसोबत खेळलेल्या खेळाडूची 32 व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती, भावुक पोस्ट लिहत म्हटलं..

या संघात वैभव सुर्यवंशीला स्थान मिळाले आहे.वैभवने आयपीएलमध्ये केलेल्या कामगिरीचे त्याला या निमित्ताने बक्षिस मिळाले आहे. मात्र वैभवला अंतिम अकरा मध्ये स्थान मिळेल की नाही हे अजून स्पष्ट झालेले नाही. सध्याची संघाची स्थिती पाहता त्याला अंतिम अकरामध्ये स्थान मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागणार आहे. आता अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसन हे ओपनिंगला खेळत आहे. शिवाय इशान किशन ही आहे. त्यामुळे वैभवला आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताकडून डेब्यू करण्याची संधी मिळते की नाही ते पाहावं लागेल. 

नक्की वाचा - IPL 2026 Awards: अलिशान कार अन् पैशांचा पाऊस! वैभव सुर्यवंशी झाला मालामाल, मिळाले सर्वाधिक पुरस्कार

वैभव शिवाय दुसरं नाव आहे ते प्रिन्स यादव याचं. प्रिन्स देशांतर्गत क्रिकेटमध्ये दिल्लीकडून खेळतो. तर आयपीएलमध्ये लखनौ संघाचा तो भाग आहे. तो उजव्या हाताने वेगवान बॉलिंग करतो. मात्र एकीकडे श्रेयस अय्यर ला कॅप्टन केल्यानंतर सुर्याला मात्र संघा बाहेर ठेवण्यात आले आहे. गेल्या काही दिवसातले बीसीसीआयचे हेच संकेत होते. त्यानुसार निर्णय घेतला आहे. पण वैभवला संधी मिळेल की नाही या बाबत सस्पेन्स होते. तो सस्पेन्स आता संपला आहे. अनेक जेष्ठ खेळाडुंनी त्याला संधी द्यावी अशी मागणी केली होती. 
 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com