जाहिरात

VIDEO: भर मैदानात राडा! खेळाडू एकमेकांना भिडले, जोरदार मारहाण, 'हा' स्टार खेळाडू पाहातच राहीला

रेड कार्ड दाखवल्यामुळे दोघांना ही मैदाना बाहेर जाण्या शिवाय पर्याय राहीला नव्हता.

VIDEO: भर मैदानात राडा! खेळाडू एकमेकांना भिडले, जोरदार मारहाण, 'हा' स्टार खेळाडू पाहातच राहीला
  • फीफा वर्ल्ड कप २०२६ च्या पार्श्वभूमीवर पोर्तुगाल आणि चिली यांच्यात मैत्रीपूर्ण सामन्यात जोरदार वाद झाला
  • पोर्तुगालचा जोआओ कॅन्सेलो आणि चिलीचा इव्हान रोमन यांच्यात हाणामारी झाली
  • राफेल लियाओ आणि इव्हान रोमन यांच्यात झालेल्या धक्काबुक्कीमुळे मॅच रेफरीने दोघांना मैदानातून बाहेर काढले
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.

फीफा वर्ल्ड कप 2026 (FIFA World Cup 2026) काही दिवसांवर येवून ठेपला आहे. अशा वेळी फुटबॉलच्या मैदानातू एक धक्कादायक घटना समोर आली आहे. त्यामुळे दोन संघामध्ये कटुता वाढण्याची दाट शक्याता वर्तवली जात आहे. वर्ल्डकप आधी  पोर्तुगाल आणि चिली या दोन देशांमध्ये एक एका मैत्रीपूर्ण (Friendly) सामन्याचे आयोजन करण्यात आले होते. मात्र या सामन्या दरम्यान नको तीच घटना घडली आहे. या सामन्यादरम्यान दोन्ही संघांचे खेळाडू आप आपसात भिडले. मैदानावर खेळाडूंमध्ये जोरदार हाणामारी झाली. त्यात काही खेळाडू हे जखमी झाले आहेत. या सामन्याचे थेट प्रक्षेपण केले जात होते. त्यामुळे ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. शिवाय याचा व्हिडीओ ही व्हायरल होत आहे.  

या सामन्यात स्टार खेळाडू क्रिस्टियानो रोनाल्डो ही खेळत होता. मात्र ज्यावेळी हा वाद झाला त्यावेळी तो शांत पणे हे सर्व काही पाहत होता. ​हा वाद सामन्याच्या पहिल्या हाफमध्ये सुरू झाला होता. पोर्तुगालचा खेळाडू जोआओ कॅन्सेलो चिलीच्या एका खेळाडूकडून चेंडू हिसकावण्याचा प्रयत्न करत होता. मात्र चिलीच्या इव्हान रोमनला ही गोष्ट आवडली नाही. त्याने यावेळी याबाबत आक्रमक भूमीका घेतली.  रोमनने कॅन्सेलोला जोरदार धक्का दिला. हे आजूबाजूच्या खेळाडूंनी ही पाहीले. तिथेच ठिणगी पडली. 

नक्की वाचा - Team india announced: सूर्या आऊट, श्रेयस इन! टीम इंडियाच्या टी 20 संघात 'या' खेळाडूची सरप्राईज एन्ट्री

 दोघांमधील वाद अधिक वाढला. यात पोर्तुगालचा राफेल लियाओ देखील पडला होता. लियाओ आणि रोमन यांच्यात आधी जोरदार बाचाबाची झाली. त्यानंतर दोघांनी एकमेकांना धक्काबुक्की केली. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून मॅच रेफरीने तात्काळ खेळ थांबवण्याचा निर्णय घेतला. रेफरीने राफेल लियाओ आणि इव्हान रोमन या दोघांना ही थेट 'रेड कार्ड' दाखवले. त्यानंतर दोघांना ही  मैदानातून बाहेर काढले. रेड कार्ड दाखवल्यामुळे दोघांना ही मैदाना बाहेर जाण्या शिवाय पर्याय राहीला नव्हता. दोघे हीनंतर बाहेर गेले. शेवटी पुन्हा एकदा खेळ सुरू झाला. 

​सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दोन्ही संघांचे खेळाडू एकमेकांवर धावून जाताना दिसत आहेत. जोरदार राडा होत आहे हे ही त्यात दिसत आहे. यामुळे काही वेळ सामना थांबवावा लागला होता. मैदानात आणि मैदाना बाहेर गोंधळ उडाला होता.  विशेष म्हणजे, पोर्तुगालचा कर्णधार क्रिस्टियानो रोनाल्डो या वादात कुठेही पडला नाही. तो मैदानात शांतपणे उभा राहून केवळ परिस्थितीचा अंदाज घेत होता. त्याची ही कृती ही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. रोनाल्डोने स्वत: ला या वादापासून दुर ठेवले होते. त्याने कोणती ही मध्यस्थी केली नाही. 
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com