
Virat Kohli Fan Video: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने आयपीएलची ट्रॉफी जिंकल्यानंतर विराट कोहलीच्या चाहत्यांचा जल्लोष सुरु आहे. याच उत्साही चाहत्यांमुळे बेंगळुरुमध्ये चेंगराचेंगरीची घटना घडली ज्यामध्ये 11 जणांना आपला जीव गमवावा लागला. या घटनेने देशभरात हळहळ व्यक्त होत असतानाच आता आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला असून एका चाहत्याने हातावर ब्लेडने वार करुन घेतल्याचा एक व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) मध्ये आरसीबीच्या विजयानंतर सोशल मीडियावर त्यांच्या चाहत्यांच्या सेलिब्रेशनचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत. काही जण भावनिक होऊन आपला आनंद व्यक्त करत आहेत, तर काही फटाके फोडून वेडे होत आहेत. अशातच एका चाहत्याचा धक्कादायक व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये या चाहत्याची कृती पाहून तुम्हालाही धक्का बसेल.
या व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, विराट कोहलीचा एक चाहता चक्क स्वतःच्या हातावर ब्लेडने कापून घेत असल्याचे दिसत आहे. या मुलगा हातावर ब्लेडने वार करुन घेतो अन् त्यातून रक्त आल्यानंतर ते समोर बॅनरवर असलेल्या विराट कोहलीच्या कपाळावर तिळक म्हणून लावतो. उत्साहाच्या भरात हा चाहता एकदा नव्हेतर अनेकदा त्याच्या हातावर वार करुन घेत असल्याचे या व्हिडिओमध्ये दिसत आहे.
??wot
— Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) June 6, 2025
pic.twitter.com/4ZuXJHttua
हा व्हायरल व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी त्यावर जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत. ज्यामध्ये या मुलाची चांगलीच खरडपट्टी केल्याचे दिसत आहे. एका युजरने या व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना अंगात रक्त जास्त झाले असेल तर कुठेतरी जाऊन रक्तदान कर असा सल्ला दिला आहे. तर आणखी एका युजरने आरसीबीचे फॅन छपरीच असतात, असा थेट टोमणा मारला आहे. तर एका नेटकऱ्याने विराट प्रेमात वेडा झालेला छपरी चाहता, अशी टीका केली आहे.
( नक्की वाचा : बॉसच्या मागं लागून सुट्टी घेतली, लॅपटॉप टेबलवर ठेवून स्टेडियमकडे पळाली, विराटची जबरी फॅन परतलीच नाही! )
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world