Virat Kohli Latest Viral Video : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात रंगलेल्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत कांगारुंनी दोन सामन्यांत विजय मिळवला. पण तिसऱ्या सामन्यात 'रोको'नं म्हणजे रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी धावांचा पाऊसच पाडला अन् तिसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाला पराभवाची धूळ चारली. सलग दोन सामन्यांमध्ये डक आऊट झाल्यानंतर कोहलीने 74 धावांची नाबाद खेळी केली. विशेष म्हणजे या धावांच्या जोरावर कोहलीने 14255 धावांपर्यत मजल मारली आणि श्रीलंकेच्या कुमार संगकाराला पिछाडीवर टाकलं. विराटच्या रन मशिनची तर चर्चा संपूर्ण क्रिडा विश्वात रंगली आहे. पण विराटने आजच्या सामन्यादरम्यान सिडनीच्या मैदानात जे काही केलं..त्या कृतीनं देशातील सर्वांचच मनं जिकलं आहे. मैदानातील तो व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सर्वच स्तरातून विराटवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
विराटने मैदानात असं काय केलं? व्हिडीओ पाहा
भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाचा पराभव केल्यानंतर विराट कोहली ड्रेसिंग रुमकडे जात असतो. त्याचदरम्यान एका व्यक्तीच्या हातातून तिरंगा झेंडा जमिनीवर पडतो. तिरंगा झेंडा खाली पडलेला दिसताच विराट लगेच तिथे थांबतो आणि झेंडा उचलून त्या व्यक्तीच्या हातात देतो. विराटच्या या कृतीमुळं खऱ्या देशभक्तीचं एक उत्तम उदाहरण समोर आलं आहे. विराटचा हा जबरदस्त व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
नक्की वाचा >> Buldhana Crime पप्पा आमचा काय दोष', पत्नीसोबत रस्त्यातच भांडण झालं,पतीनं जुळ्या पोरींचा गळा चिरला अन् नंतर..
भारताने 9 विकेट्स राखून ऑस्ट्रेलियावर मोठा विजय मिळवला. त्यानंतर भारताच्या खेळाडूंसह रोहित शर्मा आणि विराट कोहली ड्रेसिंग रुमच्या दिशेनं जात होते. तेव्हा स्टेडियममध्ये असलेल्या एका उत्साही चाहत्याच्या हातातून तिरंगा जमिनीवर खाली पडला. तेव्हा कोहलीनं तिरंगा खाली पडल्याचं पाहिलं अन् लगेच खाली पडलेला तिरंगा हातात उचलला आणि त्या व्यक्तीच्या हातात दिला. कोहलीच्या देशभक्तीपर कृत्याचं अनेकांनी कौतुक केलं आहे.
संपूर्ण जगभरात होतंय विराट कोहलीचं कौतुक
@vannumeena0 नावाच्या एका यूजरने एक्सवर हा व्हिडीओ ट्वीट केला आहे. हा व्हिडीओ पोस्ट करत कॅप्शनमध्ये म्हटलंय, विराट कोहलीने खाली पडलेल्या तिरंगा झेंड्याला खूप काळजीपूर्वक उचललं. देशाचा तिरंगा झेंडा विराटच्या हृदयात आहे. या व्हिडीओला हजारो लोकांनी लाईक केलं असून सुंदर प्रतिक्रियांचा वर्षावही केला आहे. एका यूजरने कमेंट करत म्हटलंय, देशाचा तिरंगा झेंडा विराटच्या हृदयात आहे. दुसऱ्या यूजरने म्हटलं, विराटच्या रक्तातच देशभक्ती आहे. फक्त खेळ नाही. जेव्हा हृदयात तिरंगा असतो, प्रत्येक काम मोठं बनतं. अन्य एका यूजरने म्हटलंय, विराट आहे, त्याला सलाम..
नक्की वाचा >> ऑस्ट्रेलियाच्या महिला खेळाडूंची भररस्त्यात छेड काढली! रडत रडत टीम मॅनेजमेंटला सांगितलं,पोलिसांनी CCTV पाहताच..