जाहिरात

ऑस्ट्रेलियाच्या महिला खेळाडूंची भररस्त्यात छेड काढली! रडत रडत टीम मॅनेजमेंटला सांगितलं,पोलिसांनी CCTV पाहताच..

Australia Women Cricketer Harassment Case: ऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेट टीमच्या दोन खेळाडूंसोबत छेडछाड झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

ऑस्ट्रेलियाच्या महिला खेळाडूंची भररस्त्यात छेड काढली! रडत रडत टीम मॅनेजमेंटला सांगितलं,पोलिसांनी CCTV पाहताच..
Australia Women Cricketer Molested
मुंबई:

Australia Women Cricketer Harassment Case:  इंदौरच्या होळकर स्ट्रेडियममध्ये आज ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात निर्णायक सामना होणार आहे. वर्ल्डकप सेमिफायनलमध्ये पोहोचण्यासाठी दोन्ही संघात काँटे की टक्कर होणार आहे. पण या सामन्याचा थरार सुरु होण्यापूर्वीच इंदौरमध्ये एक संतापजनक घटना घडली आहे. ज्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. ऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेट टीमच्या दोन खेळाडूंसोबत छेडछाड झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.पोलिसांनी 6 तासांच्या आत आरोपीची ओळख पटवून त्याला अटक केली आहे. ही घटना गुरुवारी सकाळी 11 वाजताच्या सुमारास घडली. 

महिला खेळाडू प्रवास करत होते,  तितक्यात दुचाकीस्वार आला अन्..

दोन्ही खेळाडू हॉटेल रॅडिसन ब्लू येथून खजराना रोडवर असलेल्या कॅफेच्या दिशेनं जात होते. याचदरम्यान, सफेद शर्ट आणि काळ्या रंगाची कॅप घातलेला तरुण त्यांचा पाठलाग करत होता. त्या तरुणाने खेळाडूंकडे अश्लील इशारे केले. काही वेळानंतर त्याने एका खेळाडूसोबत अश्लील कृत्य केलं आणि तो फरार झाला. घाबरलेल्या महिला खेळाडूंनी तातडीनं त्यांच्या टीमचे सुरक्षा अधिकारी डॅनी सिमन्स यांना लोकेशन आणि एमरजन्सी मेसेज पाठवला. या घटनेबाबत सिमन्स यांनी म्हटलंय, मी त्यांचा मेसेज वाचतच होतो, तितक्यात एका खेळाडूचा कॉल आला. ती रडत होती..कोणतरी आमची छेड काढली,असं तिने म्हटलं. त्यानंतर मी लगेच कार पाठवून त्यांना हॉटेलमध्ये बोलावलं.

नक्की वाचा >>  'दिन दिन दिवाळी, जान्हवी रेड्याला ओवाळी', जान्हवी किल्लेकर होतेय प्रचंड ट्रोल, पतीसोबतचा तो Photo केला Viral

पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले 

घटनास्थळी असलेल्या एका व्यक्तीने आरोपीच्या बाईकचा नंबर नोट केला. यामुळे पोलिसांना पुरावा सापडला. डॅनी सिमन्स यांच्या तक्रारीनुसार, एमआयजी पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा नोंदवला. त्यानंतर विजय नगर,एमआयजी, खजराना, परदेशीपुरा आणि कनाडिया पोलीस स्टेशनचे पथकाने तपास सुरु केला. सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर आरोपीची ओळख पटली. अकील असं आरोपीचं नाव असून तो खजराना येथील रहिवासी आहे.

अकीलला शुक्रवारी आझाद नगर येथून अटक केली. याप्रकरणी एडिशनल डीसीपी (क्राईम ब्रँच) यांनी म्हटलंय की, ऑस्ट्रेलियाच्या टीमच्या सुरक्षा अधिकाऱ्याच्या तक्रारीनुसार, गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपीची ओळखलं आणि त्याला सहा तासांतच अटक केली.आरोपीवर याआधीही गुन्हे दाखल आहेत. सुरक्षा प्रोटोकॉलमध्ये काही चूक झालीय का? याचाही तपास केला जात आहे.

नक्की वाचा >> CCTV Video: सराईत चोरट्यांनाही जमलं नसतं..ते या बाईनं केलं! ज्वेलर्समध्ये सर्वांसमोरच सोनं चोरलं..कसं ते पाहा

Listen to the latest songs, only on JioSaavn.com