Kavya Maran Wedding: इंडियन प्रिमियर लीग म्हणजेच आयपीएलमधील टीम सनरायझर्स हैदराबाद (SRH) ची मालकीण काव्या मारन लवकर विवाह बंधनात अडकणार आहे. काव्या लवकरच प्रसिद्ध संगीतकार अनिरुद्ध रविचंद्रनसोबत तिचं लग्न होणार असल्याचे बोलले जात आहे. नेमकं काय आहे या चर्चांमागचे सत्य? खरचं काव्या मारन लग्न बंधनात अडकणार आहे का? जाणून घ्या सविस्तर...
प्रसिद्ध संगीतकार अनिरुद्ध रविचंद्रनचे काका अभिनेते वाय. जी. महेंद्र यांनी काव्या आणि अनिरुद्धच्या लग्नाबद्दल भाष्य केले ज्यानंतर या चर्चा होत आहेत. केपीटीव्हीला दिलेल्या एका मुलाखतीत, अनिरुद्धच्या लग्नाबद्दल विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना वाय. जी. महेंद्र म्हणाले, "अनिरुद्ध खूप शांत स्वभावाचा मुलगा आहे. काव्या मारनसोबतचं त्याचं लग्न जवळपास निश्चित झालं आहे. तो एका खूप मोठ्या कुटुंबात सामील होणार आहे. या निमित्ताने मी त्याचे अभिनंदन करू इच्छितो."
Eetha Controversy : श्रद्धा कपूरचा 'इठा' चित्रपट वादात; नाव बदलण्याची मागणी का केली जातेय?
वाय. जी. महेंद्र काव्या मारनबद्दल काय म्हणाले?
काव्या मारनबद्दल बोलताना ते म्हणाले की "काव्या ही काही सामान्य मुलगी नाही. तिच्यामध्ये एवढ्या मोठ्या आयपीएल संघाला सांभाळण्याची क्षमता आहे. तिला तिच्या वडिलांकडून व्यावसायिक कौशल्ये वारसा म्हणून मिळाली आहेत. त्यांची जोडी चांगली जमते. त्यांनी एकत्र येऊन संगीत क्षेत्रात नशीब आजमावले पाहिजे." पण काव्या आणि अनिरुद्ध यांचे लग्न कधी आणि कुठे होणार? सध्या, याबद्दल कोणतीही ठोस माहिती उपलब्ध नाही. हे दोघे कधी विवाहबंधनात अडकतात हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.
दरम्यान, ते दोघे एकमेकांना डेट करत असल्याच्या बातम्या यापूर्वीही आल्या होत्या. मात्र या बातम्यांवर दोघांनीही प्रतिक्रिया दिली नव्हती. आताही लग्नाबाबत दोन्ही बाजूंनी कोणतेही निवेदन जारी केलेले नाही. महत्त्वाचं म्हणजे २०२५ मध्ये रेडिटवरील एका व्हायरल पोस्टमध्ये दावा करण्यात आला होता की, ते दोघे सुमारे एक वर्षापासून एकमेकांना डेट करत होते.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world