World Champions : देशभरात जल्लोष! कधी होणार टीम इंडियाची 'Victory' परेड? BCCI ने दिली सर्वात मोठी अपडेट

Team India Victory Parade Latest Update :  कर्णधार हरमनप्रितच्या नेतृत्वात रविवारी भारतीय क्रिकेट महिला संघाने दक्षिण आफ्रिकेच्या महिला टीमचा पराभव करून विश्वचषक जिंकलं.

जाहिरात
Read Time: 2 mins
Team India Victory Parade New Update
मुंबई:

Team India Victory Parade Latest Update :  कर्णधार हरमनप्रितच्या नेतृत्वात रविवारी भारतीय क्रिकेट महिला संघाने दक्षिण आफ्रिकेच्या महिला टीमचा पराभव करून विश्वचषक जिंकलं. महिला टीमने विश्वचषक 2025 वर विजयाची मोहोर उमटवून तब्बल 52 वर्षांची प्रतिक्षा संपवली. 2 नोव्हेंबरला रंगलेल्या फायनलच्या सामन्यात टीम इंडियाच्या महिला खेळाडूंसह देशभरातील अनेक दिग्गज सेलिब्रिटी आणि क्रिकेटप्रेमींनी विजयाचा गुलाल उधळला.पण अजूनही अनेकांना टीम इंडियाच्या विजयी परेडच्या जल्लोषात सहभागी व्हायची इच्छा आहे, अशी चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. त्यामुळे भरतीय महिला क्रिकेट संघाची विजयी परेड नेमकी कधी होणार? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. अशातच भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचिव देवजीत सैकिया यांनी मोठी अपडेट दिली आहे. 

दुबईत होणार आयसीसीची महत्त्वाची बैठक

देवजीत सैकिया यांनी न्यूज एजन्सी आयएएनएसशी संवाद साधताना माहिती दिली की, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने भारतीय महिला संघाच्या विजयी परेडच्या योजनेला अंतिम मान्यता दिलेली नाही.4-7 नोव्हेंबरला दुबईत होणाऱ्या आयसीसीच्या बैठकीनंतरच वरिष्ठ अधिकारी विजयी परेडच्या तारखेबाबत माहिती देतील. विजयी परेडबाबत आतापर्यंत कोणतीही योजना आखण्यात आली नाहीय. आयसीसी बैठकीत सहभागी होण्यासाटी दुबईत जात आहे. अनेक अधिकारी तिथे जाणार आहेत. त्यानंतर आम्ही याबाबत योजना बनवू.

नक्की वाचा >>OLA बाईकचं पेट्रोल संपलं! महिला ड्रायव्हरसोबत पंपापर्यंत 1KM चालली, रात्री घरी पोहोचताच आईसमोर रडली अन्..

विश्वचॅम्पियन बनली भारतीय माहिला टीम

भारतीय महिला टीमने महिला विश्वचषक 2025 चा किताब जिंकला आहे. हरमनप्रित कौरच्या नेतृत्वात खेळलेल्या टीम इंडियाने पहिला आयसीसी किताब जिंकून इतिहास रचला आहे.2005 आणि 2017 मध्ये भारतीय महिला क्रिकेट संघाला विश्वचषक जिंकता आलं नाही. दरम्यान, भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात रविवारी झालेल्या फायनलच्या सामन्यात भारताने 52 धावांनी विजय मिळवला आणि महिला संघ वनडे क्रिकेटमध्ये नवा विश्वचॅम्पियन बनला.

नक्की वाचा >> Shafali Verma : शेफाली वर्माचं शतक हुकलं, पण 87 धावा करून रचला इतिहास! आजपर्यंत कोणताही पुरुष क्रिकेटर करू शकला नाही

Advertisement
Topics mentioned in this article