
UAE Retired all 10 of their Batters: शनिवारी बँकॉकमध्ये महिला आशिया टी-20 विश्वचषक आशिया पात्रता स्पर्धेत यूएई आणि कतार यांच्यात झालेल्या सामन्यात अजब गजब प्रकार पाहायला मिळाला. यूएईने 16 ओव्हर्समध्ये एकही विकेट न गमावता 192 धावा काढल्यानंतर आपल्या सर्व 10 फलंदाजांना रिटायर्ड आऊट केले. पुरुष किंवा महिला टी-20 मध्ये एखाद्या संघाने आपल्या सर्व 10 फलंदाजांना निवृत्त करण्याची ही पहिलीच वेळ आहे. यानंतर युएईने कतारला फक्त 29 धावांत गुंडाळले आणि 163 धावांनी विजय मिळवला.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
या सामन्यात प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर युएईची कर्णधार ईशा ओझा आणि तिची सलामीची जोडीदार तीर्थ सतीश यांनी शंभर धावांची भागीदारी केली ज्यामध्ये ओझाने 113 आणि सतीशने 74 धावा केल्या. जेव्हा युएईचा स्कोअर 192 धावांवर पोहोचला तेव्हा त्यांनी डाव तिथेच संपवण्याचा निर्णय घेतला. मात्र टी-20 मध्ये डाव घोषित करण्याची परवानगी नाही म्हणून दोन्ही फलंदाज पॅव्हेलियनकडे निघाले आणि त्यानंतर एक-एक करून दोन फलंदाज खेळपट्टीवर आले आणि रिटायर्ड आऊट झाले. त्यानंतर युएईला 192 धावांवर सर्वबाद घोषित करण्यात आले.
A unique tactic from UAE at the Women's #T20WorldCup Asia Qualifier with 10 batters 'Retired Out' in a massive 163-run victory 😲
— ICC (@ICC) May 10, 2025
Check how it all transpired 👇https://t.co/mA95gYToQE
193 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना कतारने सुरुवातीपासूनच विकेट गमावल्या. कतारचा डाव 11.1 ओव्हरमध्येच आटोपला. कतारकडून फक्त तीन फलंदाजांनी धावा केल्या तर फक्त एका फलंदाजाला पाचपेक्षा जास्त धावा करता आल्या. युएईचे 8 फलंदाज खाते न उघडताच निवृत्त झाले. तर कतारच्या डावात सात फलंदाजांनी 0 धावा केल्या. म्हणजेच या सामन्यात 15 फलंदाजांनी आपले खातेही उघडले नाही. महिलांच्या टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यात पहिल्यांदाच असे घडले जेव्हा 15 फलंदाज शून्यावर बाद झाले.
दरम्यान, युएईकडून ओझाने 51 चेंडूत शतक ठोकत टी-20 मध्ये तिसरे शतक ठोकले. सतीशने 31 चेंडूत अर्धशतक झळकावले आणि युएईने 14 षटकांत 150 धावांचा टप्पा ओलांडला. ओझाने 14 तर सतीशने 11 चौकार मारले. 16 व्या षटकात ओझाने शेवटच्या चार चेंडूत तीन चौकार मारले. युएईचा 192 धावांचा स्कोअर महिला टी-20 मधील सर्वोच्च ऑलआउट स्कोअर ठरला.
( नक्की वाचा : Rohit Sharma : एक कॅप्टन... रोहितच्या निवृत्तीवर गौतम गंभीरच्या पोस्टची फॅन्समध्ये चर्चा )
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world