- नोएडा में 10 साल की बच्ची को वेंटिलेटर पर रखा गया है, वह जिंदगी और मौत के बीच संघर्ष कर रही है.
- ग्रेटर नोएडा के CRPF कैंप में एक कांस्टेबल ने घरेलू सहायिका बनाकर लंबे समय तक बच्ची को शारीरिक प्रताड़ना दी.
- बच्ची के शरीर पर गंभीर घाव, टूटी पसलियां, उखड़े नाखून और पुराने-नए चोट के निशान मौजूद हैं.
वयवर्ष १०...शाळेत असती तर इयत्ता पाचवी शिकत असती. ही १० वर्षांची चिमुरडी एकाकडे घरकाम करत होती. या काळात तिच्यासोबत जे काही घडलं ते शब्दात सांगणं कठीण आहे. दिल्लीच्या निर्भया हत्यांकांडाने देश हादरला होता. दिल्लीपासून काही किलोमीटर अंतरावर असाच भयानक प्रकार समोर आला आहे. जे पाहूण कोणाच्या पायाखालची जमीन सरकल्याशिवाय राहणार नाही.
उत्तर प्रदेशातील नोएडामध्ये एका दहा वर्षांची मुलगी जगण्यासाठी संघर्ष करीत आहे. मुलीची परिस्थिती गंभीर असून तिला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं आहे. दहा वर्षांची मुलगी ग्रेटर नोएडामधील सीआरपीएफ कॅम्पमधील एका सीआरपीएफ कॉन्स्टेबलकडे घरकाम करीत होती. गेल्या अनेक वर्षांपासून तिचा शारिरीक छळ केला जात होता. मुलीच्या शरीरावर गंभीर जखमा आढळून आल्या आहेत. माणुसकीला काळिमा फासणाऱ्या या प्रकारानंतर देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे.
१५ जानेवारी रोजी मुलीला पहिल्यांदा सर्वोदय रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यावेळी मुलीच्या शरीरावर जखमा संशयास्पद असल्याचं डॉक्टरांच्या लक्षात आलं. त्यांनी मेडिकल लीगल केस तयार करीत पोलिसांना सूचना दिली. डॉक्टरांनुसार, मुलीच्या शरीरावरील अनेक जखमा जुन्या आहेत. यावरुन गेल्या बऱ्याच काळापासून तिच्यावर अत्याचार केला जात होता.
प्रकृती गंभीर असतानाही घरी घेऊन गेला...
धक्कादायक बाब म्हणजे मुलीची प्रकृती गंभीर असतानाही आरोपी कॉन्स्टेबल आर्थिक कारणांचा हवाला देत तिला रुग्णालयातून डिस्चार्ज करवून सोबत घेऊन गेला. मात्र मुलीची प्रकृती अधिक बिघडल्यानंतर तिला नोएडामधील सेक्टर १२८ स्थित मॅक्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं. येथे तिला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं.
मुलीला मारहाण, अमानवीय वागणूक...
मुलीच्या मेडिकल रिपोर्टमधून अनेक धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. रिपोर्टनुसार, मुलीचं हिमोग्लोबिन अवघे १.९ आहे. तिच्या शरीरातील अनेक हाडं तुटली आहेत. दात तुटले आहेत. नखं निघाली आहेत, याशिवाय शरीरावर ठिकठिकाणी जखमा आहेत. तिच्यावर गेल्या बऱ्याच काळापासून मारहाण केली जात आहे, हे यावरुन स्पष्ट होतं.
आरोपी सीआरपीएफ कॉन्स्टेबलचं निलंबन...
हे प्रकरण समोर आल्यानंतर आरोपी सीआरपीएफ कॉन्स्टेबलचं निलंबन करण्यात आलं आहे. प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेता उत्तर प्रदेशातील पोलिसांची टीम रुग्णालयात तैनात आहे.