- गोवा में गिरफ्तार रूसी नागरिक अलेक्सी लियोनोव ने दो महिलाओं की हत्या का जुर्म कबूल किया है.
- अलेक्सी की पहली लिव-इन पार्टनर एलेना कस्थानोवा की गला रेतकर हत्या अरंबोल इलाके में हुई थी.
- अलेक्सी ने कोरगांव गांव में एक तीसरी महिला की हत्या का दावा किया है, जिसके नशीले पदार्थ देकर मारने का संदेह है
Goa Serial Killer : गोव्यात एक हादरवून टाकणारी घटना उघडकीस आली आहे. काही दिवसांपूर्वी गोव्यात दोन रशियन महिला हत्या प्रकरण समोर आलं होतं. या प्रकरणाच्या तपासादरम्यान धक्कादायक माहिती समोर आली आहे. या दोन महिलांच्या हत्या प्रकरणात रशियन नागरिक अलेक्सी लियोनोव याला ताब्यात घेण्यात आलं आहे. ३७ वर्षीय अलेक्सी लियोनोव याला शुक्रवारी अटक करण्यात आली. अलेक्सीने या दोन महिलांची अत्यंत क्रूरपणे हत्या केली होती.
काही दिवसांपूर्वी उत्तर गोव्याच्या अरंबोल भागात त्याची कथित लिव्ह इन पार्टनर एलेना कस्थानोवा हिचा मृतदेह सापडला होता. एलेनाचा गळा चिरण्यात आला होता. गुरुवारी रात्री तब्बल ९.१५ वाजता घरमालकाने खोलीत तिचा मृतदेह पाहिला, ज्यानंतर खळबळ उडाली. गोवा पोलिसांच्या सूत्रानुसार, चौकशीदरम्यान पोलीस आणखी एका मृतदेहापर्यंत पोहोचले. हा मृतदेह मोरजिम गावात सापडला. मृतदेह एका महिलेचा होता. ३७ वर्षीय एलेना वानेएवा हिची हत्या १४ जानेवारी रोजी करण्यात आली होती. तिचाही गळा कापण्यात आला होता. ही दोन्ही हत्या अलेक्सीने केल्याची कबुली दिली आहे.
आरोपीचा धक्कादायक दावा...
संशयित अलेक्सी लियोनोव यांनी पोलीस चौकशीत १५ महिलांना मोक्ष दिल्याचा दावा केला आहे. हा तरुण रशियन महिलांशी मैत्री करायचा आणि नंतर प्रेमाच्या जाळ्यात ओढायचा. आरोपी अलेक्सी हा पैशांसाठी महिलांचा खून करीत होता. तो रशियन मुलींना हेरुन त्यांना प्रेमाच्या जाळ्यात ओढत होता. नंतर पैसे उकळत होता. मात्र महिला अन्य व्यक्तीच्या संपर्कात आल्यास तो तिचा खून करीत होता. असं करीत १५ महिलांची हत्या केल्याचा दावा त्याने केला आहे. केवळ गोव्यातच नाही तर हिमाचल प्रदेशात मिळून १५ महिलांची हत्या केल्याची कबुली दिली आहे.
१५ महिलांना मोक्ष दिला...
१ पेडणे तालुक्यातील ३५ वर्षीय एलिना हिचा गळा चिरून खून
२ मोरजी येथे ३७ वर्षीय एलिना वानिवा या रशियन महिलेचा बाथरुममध्ये नग्नावस्थेत मृतदेह
(सध्या या दोन हत्या प्रकरण उघडकीस आलं असून पोलिसांकडून इतर हत्येचा शोध घेतला जात आहे.)
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world
