Palghar News : मॅरेथॉन स्पर्धेत तृतीत क्रमांक पटकावणाऱ्या 15 वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू; कुटुंब हादरलं

पालघरच्या तलासरी तालुक्यातील वेवजी येथील लोकभारती संस्थेच्या भारती अकादमी इंग्लिश स्कूलमध्ये एक धक्कादायक प्रकार घडला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

मनोज सातवी, प्रतिनिधी

Palghar News : पालघरच्या तलासरी तालुक्यातील वेवजी येथील लोकभारती संस्थेच्या भारती अकादमी इंग्लिश स्कूलमध्ये एक धक्कादायक प्रकार घडला आहे. शालेय क्रीडा स्पर्धेत शाळेत ५ किलोमीटर मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलं होतं. या स्पर्धेत जिंकलेल्या एका १५ वर्षांच्या विद्यार्थिनीचा मृत्यू झाला आहे. या घटनेने विद्यार्थ्यांसह पालकांनाही जबर धक्का बसला आहे. 

मॅरेथॉन जिंकली परंतू जगण्याची स्पर्धा हरली...

पालघरमधील तलासरी तालुक्यातील वेवजी येथील लोकभारती संस्थेच्या भारती अकादमी इंग्लिश स्कूलमध्ये शनिवारी मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. यादरम्यान तृतीय क्रमांक पटकावलेल्या दहावीतील विद्यार्थिनीचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. रोशनी रमेश गोस्वामी असं मृत विद्यार्थिनीचं नाव आहे. मॅरेथॉन स्पर्धा पूर्ण केल्यानंतर अवघ्या काही वेळातच तिला हृदयविकाराचा झटका आल्याचं सांगितलं जात आहे. हृदयविकाराचा झटका आल्यानंतर तिला तातडीने गुजरातमधील उंबरगाव येथील रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. 

नक्की वाचा - Raigad News : खोपोलीच्या मंगेश काळोखे हत्या प्रकरणात सर्वात मोठी अपडेट, पुण्याच्या अटकेनंतर महत्त्वाचा खुलासा

रोशनीच्या कुटुंबाला जबर धक्का...

या घटनेमुळे रोशनीच्या कुटुंबाला जबर धक्का बसला आहे. रोशनीने घरातून नाश्ता करून निघाली होती. तिने आईला नमस्कार केला, आशीर्वाद मागितले. त्यानंतर दुपारी शाळेकडून मुलीच्या मृत्यूची बातमी आल्याचं रोशनीच्या आईने सांगितलं. धावण्यामुळेच हा झटका आल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेमुळे शाळा परिसरात शोककळा पसरली आहे.

Advertisement