जाहिरात

Menstrual Pain :मासिक पाळीमुळे 19 वर्षांच्या मुलीचा मृत्यू; 19 वर्षांच्या कीर्तनाची हृदय पिळवटून टाकणारी कहाणी

Menstrual Pain: नोकरी आणि चांगल्या करिअरचं स्वप्न पाहणाऱ्या एका १९ वर्षांच्या मुलीचा मासिक पाळीत होणारी पोटदुखी आणि वेदनेतून जीव गेला.

Menstrual Pain :मासिक पाळीमुळे 19 वर्षांच्या मुलीचा मृत्यू; 19 वर्षांच्या कीर्तनाची हृदय पिळवटून टाकणारी कहाणी
मासिक पाळीतील वेदनेतून तरुणीचा दुर्देवी शेवट

Menstrual Pain Death: कधी कधी वेदना केवळ शारिरीक नसतात तर मानसिकही असतात. एक अशी कहाणी समोर आलीये जी वाचून तुमचं हृदय पिळवटून निघेल. नोकरी आणि चांगल्या करिअरचं स्वप्न पाहणाऱ्या एका १९ वर्षांच्या मुलीचा मासिक पाळीत होणारी पोटदुखी आणि वेदनेतून जीव गेला. मासिक पाळीबाबत आजही खुलेपणाने बोललं जात नाही. यातून एका तरुण मुलीचं स्वप्न आणि जबाबदारीच्या ओझ्याखाली बळी गेला. 

गावात जीवघेणी शांतता, कुटुंबाला धक्का...

आजही मासिक पाळीबद्दल खुलेपणाने बोललं जात नाही. मुली आजही यादरम्यान होणारा त्रास व्यक्त करीत नाहीत. कर्नाटकातील तुमकुरुमधून १९ वर्षांच्या कीर्तनाच्या मृत्यूच्या वृत्ताने सर्वांनाच धक्का बसला आहे. कलबुर्गीच्या सलहल्लीची राहणारी कीर्तना नोकरीच्या शोधात दोन महिन्यांपूर्वी मामाच्या घरी आली होती. काम न मिळाल्याने ती तिथंच राहत होती. कुणाला कल्पनाही नव्हती, तिच्या शरीरात होत असलेल्या यातना इतक्या धोकादायक आहेत. 
 

Latest and Breaking News on NDTV

वेदनेचं जीवघेणं रुप... (Karnataka youth mental health)

कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, कीर्तना गेल्या अनेक महिन्यांपासून गंभीर पोटदुखी आणि मासिक पाळीतील वेदनेमुळे त्रस्त होती. या वेदना इतक्या तीव्र होत्या की ती दिवसाचं नियमित कामही करू शकत नव्हती. ज्या दिवशी ही घटना घडली, त्या दिवशी घरात कुणीच नव्हतं. एकटेपणा आणि असहाय्य वेदनेत तिने स्वत:चा जीव घेतला. कुटुंबाला याबाबत कळताच त्यांना जबर धक्का बसला. 

पोलीस चौकशी आणि कायदेशीर प्रक्रिया...(Police Investigation Underway)

कीर्तनाच्या आत्महत्येबाबत कळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे. पोलिसांकडून तपास सुरू आहे. ही घटना केवळ एक वैयक्तिक शोकांतिका नाही तर एक मोठा प्रश्न देखील उपस्थित करते. आपण महिलांचे आरोग्य, विशेषतः मासिक पाळीदरम्यान आरोग्य आणि दीर्घकालीन वेदना, गांभीर्याने घेतो का? ही वेदना अनेकदा सामान्य म्हणून नाकारली जाते, मात्र अनेकदा ही वेदना जीवघेणी ठरू शकते. 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com