जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगरजवळ ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात झाल्याचं समोर आलं आहे. मुंबई नागपूर राष्ट्रीय महामार्गावर ट्रॅव्हल्सने ट्रकला मागून धडक दिली. पहाटेच्या वेळी हा अपघात झाल्याचं सांगितलं जात आहे. या अपघातात 2 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर 15 ते 20 प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. अपघातानंतर तातडीने पोलीस घटनास्थळी पोहोचले. यावेळी नागरिकांनीही मदत करीत जखमींना मुक्ताईनगर उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आलं आहे.
बातमी अपडेट होत आहे..
Topics mentioned in this article
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world