आंबा घाटातील सड्याच्या कडावरून 2 तरुण गायब, दुचाकी आढळली; रत्नागिरी-कोल्हापुरात खळबळ

रत्नागिरी-कोल्हापूर जिल्ह्यांना जोडणाऱ्या आंबा घाटातील सड्याचा कडा येथून दोन तरुण गायब झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

जाहिरात
Read Time: 1 min
रत्नागिरी:

रत्नागिरी-कोल्हापूर जिल्ह्यांना जोडणाऱ्या आंबा घाटातील सड्याचा कडा येथून दोन तरुण गायब झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. बेळगाव-निपाणी येथील सुशांत जीरंग सातवेकर आणि कोल्हापूर येथील स्वरुप दिनकर माने हे दोन तरुण गायब झाले असून त्यांची दुचाकी सह्याद्री चांदोली व्याघ्र प्रकल्प याठिकाणी आढळून आली आहे. त्यांनी सड्याचा कडा येथून आत्महत्या केली की, ते कुठे गायब झाले याचा शोध रत्नागिरी-कोल्हापूर पोलिसांकडून घेतला जात आहे. 

नक्की वाचा - आईचा मृत्यू, कुलकर्णी भावंडांचं टोकाचं पाऊल; आदिवासींना मोठी मदत करून सोडला जीव

याबाबतची तक्रार कागल पोलीस स्थानकात दाखल करण्यात आली आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर रत्नागिरी जिल्ह्यातील देवरुख व कोल्हापूरमधील शाहूवाडी पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक आपल्या टिमसह घटनास्थळी दाखल झाले होते. मात्र रात्रीच्या सुमारास कड्यावरुन सर्च ऑपरेशन राबवणे शक्य नसल्याने आज सकाळपासून सड्याचा कडा येथून खाली दीडशे फूट खोल सर्च ऑपरेशन रत्नागिरी व कोल्हापूर पोलीसांमार्फत सुरू होणार आहे.