जाहिरात

आईचा मृत्यू, कुलकर्णी भावंडांचं टोकाचं पाऊल; आदिवासींना मोठी मदत करून सोडला जीव

सुशिक्षित कुटुंबातील कुलकर्णी भावंडांनी टोकाचं पाऊस उचलल्यानंतर अनेकांना धक्का बसला होता.

आईचा मृत्यू, कुलकर्णी भावंडांचं टोकाचं पाऊल; आदिवासींना मोठी मदत करून सोडला जीव
कोल्हापूर:

आईच्या निधनानंतर विरह सहन न झाल्याने अडीच महिन्यानंतर कोल्हापुरातील (Kolhapur News) भावंडांनी तलावात उडी मारून आपलं आयुष्य संपवल्याची घटना समोर आली आहे. 15 ऑगस्ट रोजी दोघांचा मृतदेह तलावात तरंगताना दिसल्यानंतर याचा खुलासा झाला होता. आता या प्रकरणात मोठी माहिती समोर आली आहे. सुशिक्षित कुटुंबातील कुलकर्णी भावंडांनी टोकाचं पाऊस उचलल्यानंतर अनेकांना धक्का बसला होता. दोघेही अविवाहित होते. त्यामुळे त्यांचं सर्व जग आईभोवतीत होते. तिच्या निधनानंतर दोघांना आईचा विरह सहन न झाल्याने त्यांनी टोकाचं पाऊल उचललं. 

भूषण निळकंठ कुलकर्णी व भाग्यश्री निळकंठ कुलकर्णी हे सख्खे भाऊ-बहीण आहेत. स्वातंत्र्यदिनी या बहीण भावाने एकत्र तलावात उडी घेऊन आत्महत्या केली. या घटनेनंतर त्यांच्याबाबत नवी माहिती समोर आली आहे. या दोन्ही भावंडानी मृत्यूपूर्वी लाखो रुपये दान केले आहे. त्यांच्या नातेवाईकानी ही माहिती दिली. आईच्या मृत्यूनंतर दोघेही निराशेत बुडाले होते. गेल्या दोन महिन्यांपासून खाण्या-पिण्यावरही त्यांचं लक्ष नसल्याचं नातेवाईकांनी सांगितलं. 

यांच्या आई पद्मजा निळकंठ कुलकर्णी यांनी इतिहास विषयातील एम.ए. व्होकल म्युझिकमध्येही पदव्युत्तर शिक्षण त्यांनी पूर्ण केलं होतं. संस्कृत हा त्यांच्या आवडीचा विषय होता. शास्त्रीय संगीत आणि ज्योतिषशास्त्रातही त्यांना आवड होती. त्यामुळे  आईच्या निधनानंतर दोघा भावंडानी संस्कृत विषयाची संबंधित वाई येथील प्राज्ञपाठ शाळा मंडळाला 25 लाखांची देणगी दिली.  

नक्की वाचा - न्यायालयातच वकील कोसळला, न्यायाधीशही धावले; नागपुरात वकिलाचा धक्कादायक शेवट!

कोल्हापुरात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. सख्ख्या भाऊ बहिणीने तलावात उडी घेत आत्महत्या केलीय. त्यांच्या आईचे अडीच महिन्या पूर्वी निधन झाले होते. आईचा विरह या दोन्ही भाऊ बहिणींना सहन झाला नाही. शेवटी त्यांनी टोकाचं पाऊल उचलत आपली जीवनयात्र संपवली. या घटनेनं नंतर संपुर्ण कोल्हापुरमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. 

भूषण निळकंठ कुलकर्णी व भाग्यश्री निळकंठ कुलकर्णी हे सख्खे भाऊ-बहीण आहेत. कोल्हापुरच्या नाळे कॉलनीत ते राहायला होते. दोघेही अविवाहीत आहे.अडीच महिन्यांपूर्वीच त्यांच्या आई पद्मजा यांचे निधन झाले होते. तेव्हापासून ते खचून गेले होते. ते नैराश्यात गेले होते. आई शिवाय जिवन व्यर्थ आहे असं त्यांनी मन बनवलं होतं. त्यातूनच आत्महत्या करण्याच विचार त्यांच्या डोक्यात आला. दोघांनीही निर्णय घेतला. एकत्रीत जिवन संपवायचं असं त्यांनी ठरवलं. गेल्या दोन महिन्यात या दोघांनी सोलापूर, नागपूर, पुणे, सातारा यासह अन्य काही जिल्ह्यातील आदिवासी वाड्या वस्त्यांवरील शाळांना, सामाजिक संस्थांना लाखो रुपयांची मदत केली आहे. आई गेल्याच्या विरहांनंतर आपली संपत्ती दान केल्याचं त्यांच्या नातेवाईकांकडून

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com