मनोज सातवी. प्रतिनिधी
Viva College Garba Controversy : विरारच्या विवा कॉलेजमध्ये नवरात्री निमित्त सुरू असलेल्या गरब्यात येणाऱ्या मुलींवर दोन (मुस्लीम) तरुणांनी सोशल मीडियावर केलेल्या अश्लील चॅटमुळे खळबळ उडाली आहे. या चॅटमध्ये “एकही हिंदू मुलगी सोडू नका” तसेच इतर अश्लील आणि वादग्रस्त वाक्यांचा समावेश आहे. या आक्षेपार्ह चॅट प्रकरणी बोळींज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आक्षेपार्ह चॅट ( Viva College whatsapp chat ) करणाऱ्या अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेतले आहे.
काय आहे त्या व्हॉट्सअॅप चॅटमध्ये?
या व्हॉट्सअॅप चॅटमध्ये दोन तरुणांचं संभाषण आहे. यामध्ये ते मुलींसोबत शरीरसंबंध ठेवण्याबाबत बोलत आहे. जी हिंदू मुलगी दिसेल तिच्याशीwh जवळीक कर असा सल्ला या व्हॉट्सअॅप चॅटमध्ये देण्यात आला आहे. याशिवाय रात्रीच्या वेळी मुलींना कॉलेजमधील कुठला मजला निर्मनुष्य असेल याचाही या चॅटमध्ये उल्लेख आहे. या चॅटमध्ये अत्यंत अश्लील आणि आक्षेपार्ह शब्दांचा वापर करण्यात आला आहे.
दरम्यान भाजप युवा मोर्चा प्रदेश सचिव अशोक शेळके यांनी याला लव्ह जिहादचा कट असल्याचा गंभीर आरोप भाजपाने करून गरबा हा केवळ हिंदूसाठीच अशी भूमिका घेतली आहे. माजी आमदार हिंतेद्र ठाकूर यांनी भाजपाच्या आरोपांवर प्रतिहल्ला केला असून गरबा सर्वांसाठी असल्याचे म्हटले आहे.
नक्की वाचा - Delhi News : घरी जात असताना अचानक सळई डोक्यात घुसली, 5 वर्षांच्या मुलीच्या मृत्यूने सारेच सुन्न
विरारच्या विवा महाविद्यालयात गुजराथी मित्रमंडळ आणि U238 या संस्थेच्या संयुक्त विद्यमाने गरब्याचे आयोजन करण्यात आले आहे. या गरब्यात येणाऱ्या मुलींसंदर्भात दोन तरूणांने आक्षेपार्ह चॅट व्हायरल झाले आहे. हे चॅट व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे. या संभाषणात गरब्यात असलेल्या मुलींवर कशा प्रकारे अत्याचार करता येईल असं त्या तरुणाने सांगितले आहे. गरब्याआडून लव्ह जिहाद सुरू असल्याचा आरोप भाजप युवा मोर्चा प्रदेश सचिव अशोक शेळके यांनी केला आहे.
तर, "ज्यांनी हे आरोप केले आहेत त्यांच्या एवढे मूर्ख जगात कुठेही बघायला मिळणार नाही" असे म्हणत माजी आमदार हितेंद्र ठाकूर यांनी भाजपने केलेल्या आरोपांची खिल्ली उडवली. तसेच, या गरब्याचा महाविद्यालयाशी काही संबंध नाही. खासगी संस्थेचा हा गरबा असून तो केवळ महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित केला जातो. त्यात सुरक्षेचे सर्व नियमांचे पालन होते. गरबा हा सर्वधर्मियांसाठी खुला आहे. कुणावरही बंदी घालणे चुकीचे असल्याचे त्यांनी म्हटले आहे. या प्रकरणी विवा कॉलेज प्रशासनाने तत्काळ भूमिका घेत बोईसर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी या प्रकरणी अश्लील आणि वादग्रस्त चॅट करणाऱ्या दोन आरोपीपैकी एका अल्पवईन आरोपीला ताब्यात घेतले आहे, तर दुसऱ्याचा शोध सुरु आहे.
कॉलेज प्रशासनाने या घटनेला गांभीर्याने घेत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. गरब्यातील चॅट वादामुळे वातावरण तापले असले तरी कॉलेज प्रशासन आणि हितेंद्र ठाकूर यांनी भाजपाच्या आरोपांना जोरदार प्रतिवाद करत, या प्रकरणाला राजकीय रंग दिला जात असल्याचा आरोप ठाकूर यांना आहे. त्यामुळे या प्रकरणी आता कोणते नवीन खुलासे होतात ते पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.