जाहिरात
Story ProgressBack

...म्हणून वीरशिला बचावली; विरार रेल्वे स्थानकाजवळ पती-पत्नीमधील रक्तरंजित खेळ

सकाळच्या वेळी विरार रेल्वे स्थानकात कामावर जाण्यासाठी चाकरमान्यांची मोठी गर्दी असते. या गर्दीच्या वेळी विरार रेल्वे स्थानकावरील ब्रिजवर हा धक्कादायक प्रकार घडला.

Read Time: 2 mins
...म्हणून वीरशिला बचावली; विरार रेल्वे स्थानकाजवळ पती-पत्नीमधील रक्तरंजित खेळ
मुंबई:

मनोज सातवी, प्रतिनिधी 

विरार रेल्वे स्टेशनवरील दक्षिण बाजूच्या फ्लाओव्हर ब्रिजवर एका 27 वर्षीय महिलेवर तिच्या पतीने चाकूने वार केल्याची धक्कादायक (Virar Crime News) घटना घडली आहे. शिवा शर्मा असे हल्लेखोर पतीचे नाव आहे. या हल्ल्यात महिलेच्या गळ्यावर आणि हातावर गंभीर दुखापत झाली आहे. हल्ला झाल्यानंतर या ठिकाणी काही काळ एकच गोंधळ उडाला होता. मात्र काही सतर्क नागरिकांनी तत्काळ हल्लेखोराला अडवल्यामुळे महिलेचा जीव वाचला. घटनेची माहिती मिळतात तत्काळ आरपीएफने हल्लेखोराला पकडून जीआरपीच्या ताब्यात दिले. तर जखमी महिलेला उपचारासाठी स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पती-पत्नीच्या कौटुंबिक वादातून हल्ला झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सकाळी सात वाजताच्या सुमारास ही घटना घडली आहे.  

सकाळच्या वेळी विरार रेल्वे स्थानकात कामावर जाण्यासाठी चाकरमान्यांची मोठी गर्दी असते. या गर्दीच्या वेळी विरार रेल्वे स्थानकावरील ब्रिजवर शिवा शर्मा याने त्याची पत्नी वीरशिला शर्मा हिच्यावर मागून येत धारदार चाकूने वार केला होता. त्यानंतर लागलीच चाकू तिच्या पोटात खुपसण्याच्या प्रयत्नात असताना वीरशिला हिने चाकू पकडला. त्यानंतर आजूबाजूला जमलेल्या प्रवाशांनी तत्काळ शिवाला पकडले. त्यामुळे पुढील अनर्थ टाळला. त्यानंतर घटनास्थळी दाखल झालेल्या आरपीएफने आरोपीला ताब्यात घेतले. तसेच जखमी वीरशिला हिला तत्काळ जवळ असलेल्या संजीवनी रुग्णालयात दाखल करण्यात आले अजून तिची प्रकृती सध्या स्थिर असल्याचं पोलिसांनी सांगितलं. 

नक्की वाचा - मेधा पाटकरांना 5 महिन्यांचा तुरुंगवास अन् 10 लाखांचा दंड, न्यायालयाने कोणत्या प्रकरणात सुनावली शिक्षा?

पालघर-वसईमधील महिलांवरील हल्ल्यांच्या घटना

1) दिनांक 10 जून रोजी सकाळच्या वेळेत पालघर तालुक्यातील मुरबे येथील स्नेहा चौधरी (19) हिची तिचा प्रियकर सुमित तांडेल (21) याने दगडाने डोक्यात वार केला होता. यानंतर तिला खाडीच्या पाण्यात बुडवून तिची हत्या केली होती. 

2) दिनांक 18 जून रोजी वसई पूर्वेकडील वालीव परिसरातल्या चिंचपाडा येथे सकाळी साडेआठच्या सुमारास रोहित यादवने (29) प्रेयसी आरती यादव (22) हिची भर रस्त्यात लोखंडी पान्याने डोक्यावर घाव घालून हत्या केली होती. विशेष म्हणजे गर्दीने गजबजलेल्या रस्त्यावर रोहित हा आरतीवर हल्ला करीत असताना तिला वाचवण्याचा कुणीही प्रयत्न केला नाही. अन्यथा तिचा जीव वाचला असता.

3) दिनांक 24 जून  रोजी विरार पूर्वेच्या फुलपाडा येथील साईनाथ इमारतीत राहणाऱ्या धनश्री आंबडस्कर (32) या विवाहितेची तिचा प्रियकर शेखर कदम याने घरात कुणीही नसताना धनश्रीची गळा आळून हत्या केली होती. 

(4) आज दिनांक 3 जुलै रोजी विरार रेल्वे स्थानकात 27 वर्षीय वीरशिला शर्मा हिच्यावर पती शिवा शर्मा यांनी धारदार चाकूने प्राणघातक हल्ला केला. हल्ल्याच्या वेळी सतर्क नागरिकांनी तत्काळ हस्तक्षेप करत शिवाला पकडल्यामुळे पुढील अनर्थ टळला. अन्यथा बघ्यांच्या गर्दीतून कोणी पुढे आल्या नसता तर तिचा देखील आरती यादव प्रमाणे जीव गेला असता.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Switch To Dark/Light Mode
Our Offerings: NDTV
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • इंडिया
  • मराठी
  • 24X7
Choose Your Destination
Previous Article
बाबाच्या पायाखालील धूळ घेण्यासाठी धाव अन् काही क्षणात मृतदेहांचा खच; हाथरसमध्ये 121 बळी! 
...म्हणून वीरशिला बचावली; विरार रेल्वे स्थानकाजवळ पती-पत्नीमधील रक्तरंजित खेळ
hathras-stampede-narayan-sakar-secret-wearing-white-suit-only-girls-enter-in room
Next Article
Hathras : बाबाच्या खोलीत फक्त मुलींना होता प्रवेश! पांढरे कपडे घालणाऱ्या नारायण साकारचे वाचा रहस्य
;