Pooja Khedkar House Robbery: बडतर्फ आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या घरी जबरी चोरी झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पूजा खेडकर यांना बांधून ठेवत, तसेच त्यांची आई आणि वडिलांना गुंगीचे औषध देत घर लुटल्याचे समोर आले आहे. या घटनेनंतर २४ तासांनी पोलिसांनी स्वतःहून (सुओ मोटो) एफआयआर दाखल केला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
पूजा खेडकरच्या घरी चोरी
याबाबत सविस्तर माहिती अशी की, खोट्या कागदपत्रांमुळे बडतर्फ झालेली माजी आयएएस अधिकारी पूजा खेडकर आणि तिचे कुटुंबीय नव्या प्रकरणाने चर्चेत आले आहे. पूजा खेडकर यांच्या बाणेर रोडवरील घरामध्ये चोरी झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. शनिवारी रात्री सात आरोपींनी घरात घुसून पूजा खेडकर आणि त्यांच्या कुटुंबियांना डांबून ठेवत साहित्य लंपास केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
तक्रारीनुसार, पूजा खेडकर यांच्या घरात १५ दिवसांपूर्वी नेपाळहून एक नोकर आला होता. त्याने आणि त्याचे सहा साथीदार घरात घुसले. त्यांनी पूजा खेडकर यांचे हात-पाय बांधले, त्यांना एका खोलीत डांबून ठेवले आणि जीव मारण्याची धमकी दिली. त्यानंतर त्यांची आई मनोरमा खेडकर तसेच वडील दिलीप खेडकर यांना गुंगीचे औषध देत बेशुद्ध केले. त्यासोबतच घरातील चालक, वॉचमन आणि आचारी यालाही बेशुद्ध करण्यात आले.
पोलिसात गुन्हा दाखल
आरोपींनी कपाटे तोडून साहित्य तसेच मोबाईल फोन चोरल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेनंतर पूजा खेडकर यांनी कशीबशी स्वतःची सुटका केली आणि चतुशृंगी पोलीस स्टेशनला फोन करत घटनेची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. अखेर आता या प्रकरणात भादंवि कलम 310(2), 310(5), 316(4), 306, 127(7), 123 आणि 351(2) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Badlapur News : भाजपाचा मोठा निर्णय! बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीची नगरसेवक पदावरून हकालपट्टी
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world