समाजातील अनिष्ट प्रथा, गुन्हेगारी रोखण्याची जबाबदारी पोलिसांवर आहे. पण, पोलीस स्वत:चं कर्तव्य विसरल्याच्या घटना अनेकदा घडल्या आहेत. याच प्रकारातील एक धक्कादायक घटना नुकतीच घडली आहे. तीन ट्रॅफिक पोलीस कर्मचारी पैशांची विभागणी करताना CCTV कॅमेऱ्यात आढलले. हे सर्वजण यामधील एकानं लाच म्हणून घेतलेली रकमेची विभागणी करत होते. त्यावेळी CCTV कॅमेऱ्यामुळे त्यांचा हा प्रकार उघडकीस आला.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
सोशल मीडियामध्ये व्हायरल झालेला हा व्हिडिओ दिल्लीचा असल्याची माहिती मिळतीय. या व्हिडिओमध्ये एक पोलीस कर्मचारी चेकपोस्टमध्ये बसलेल्या एका व्यक्तीशी वाद घालताना दिसत आहे. त्रिलोकपुरी सर्कल गाजीपूर भागातील हा व्हिडिओ आहे.
( नक्की वाचा : मुंबईच्या प्रसिद्ध हॉस्पिटलमधील महिला डॉक्टरवर हल्ला, आरोपी फरार )
थोड्या संभाषणानंतर पोलीस त्या माणसाकडं हातवारे करतात. त्यानंतर तो माणून नोटांचं बंडल आतमधील टेबलवर ठेवतो. ती व्यक्ती तिथून निघून गेल्यानंतर पोलीस कर्मचारी खाली बसून नोटा मोजतो. त्यानंतर हे सर्व पोलीस एकमेकांच्या बाजूला बसतात. त्यामधील पहिला पोलीस अन्य दोघांना त्यांचा हिस्सा देतो. पैसे मिळाल्यानं अन्य दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांचा चेहरा चांगलाच आनंदी झाल्याचं व्हायरल व्हिडिओतून दिसत आहे.
दिल्लीचे नायब राज्यपाल व्ही. के. सक्सेना यांनी या व्हायरल व्हिडिओची दखल घेतली आहे. या व्हिडिओमधील दोन व्यक्ती सहाय्यक पोलीस निरिक्षक तर एक पोलीस कॉन्स्टेबल आहे, असून त्यांना निलंबित करण्यात आल्याची माहिती त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर दिली आहे.