गणपतीपुळेच्या समुद्रात 3 जण बुडाले, एकाला वाचवण्यात यश

गणपतीपुळे समुद्रात तीन जण बुडाल्याची घटना घडली आहे. रविवारी संध्याकाळी ही घटना घडली.

Advertisement
Read Time: 2 mins
रत्नागिरी:

गणपतीपुळ्याला अनेक पर्यटक पर्यटनासाठी येत असतात. इथं येणाऱ्या पर्यटकाना गपणतीपुळ्याचा समुद्र नेहमीच खुणावत असतो. सुंदर आणि स्वच्छ समुद्र सर्वांना हवाहवासा वाटतो. त्यामुळे समुद्रात जाण्यापासून पर्यटक स्वत:ला रोखू शकत नाहीत. त्यामुळे अनेक वेळी पर्यटक बुडाल्याच्या घटना घडल्या आहेत. अशीच एक घटना रविवारी संध्याकाळी घडली आहे. पर्यटनासाठी आलेल्या तिन मित्र गणपतीपुळ्याच्या समुद्रात बुडाले. त्यातल्या एकाला वाचवण्यात यश आले. मात्र दोघांना आपला जीव गमवाला लागला. या घटनेमुळे गणपतीपुळ्याला आलेल्या पर्यटकांनी हळहळ व्यक्त केली आहे. 

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

गणपतीपुळे समुद्रात तीन जण बुडाल्याची घटना घडली आहे. रविवारी संध्याकाळी ही घटना घडली. त्यातल्या एकाला तिथल्या स्थानिक लोकांनी वाचवले. पण दोघांचा बुडून मृत्यू झाला आहे.पाण्याचा अंदाज न आल्याने हे दोघे जण बुडाले आहेत. मृत झालेले दोघे जेएसडब्ल्यूचे कंत्राटी कर्मचारी आहेत. प्रदीप कुमार आणि मोहम्मद असिफ अशी मृतांची नावं आहेत. त्यांचे मृतदेह समुद्रातून बाहेर काढण्यात आले आहे. त्यानंतर गणपतीपुळेच्या समुद्र किनारी बघ्यांची एकच गर्दी झाली होती. 

ट्रेडिंग बातमी - '... तर शरद पवार पंतप्रधान झाले असते', सुशिलकुमारांनी सांगितला भन्नाट किस्सा

कोणत्याही सिजनमध्ये गणपतीपुळे येथे पर्यटक मोठ्या संख्येने येत असतात. गणपतीच्या दर्शनाबरोबर स्वच्छ सुंदर समुद्रात पोहण्याचा आनंद पर्यटक इथे घेत असतात. इथला समुद्र तसा खोल आहे. याची कल्पना पर्यटकांना आधीच दिली जाते. पण तरीही काही हौशी आणि उत्साही पर्यटक खोल समुद्रात जातात. त्यात एखादी मोठी लाट आली तर त्यातू अशा दुर्दैवी घटना होत असतात. अशा घटना याआधीही झाल्या आहेत.