'इस हात से दो, उस हात से लो ' 3 पोलिसांचा अजब कारनामा

दीपक शंकर जाधव सहा.पोलीस निरीक्षक, आबासाहेब तुकाराम शिरगारे, पोलीस उप निरीक्षक आणि संतोष बळीराम कांबळे अशी लाच घेणाऱ्या तीन पोलिसांची नावे आहेत.

जाहिरात
Read Time: 2 mins
कोल्हापूर:

कोल्हापुरात दोन पोलीस अधिकाऱ्यासह एका कॉन्स्टेबलला लाच घेतल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. त्यांनी जप्त केलेला जनावरांचा टेम्पो परत देण्यासाठी त्यांनी 50 हजाराची लाच मागीतली होती. या प्रकरणी लाचलुचपत विभागाने कारवाई केली. केलेल्या कारवाईत पोलिसच लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात अडकले. त्यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी एक एपीआय, एक पीएसआय आणि एक कॉन्स्टेबल या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात दीपक शंकर जाधव सहा.पोलीस निरीक्षक, आबासाहेब तुकाराम शिरगारे, पोलीस उप निरीक्षक आणि संतोष बळीराम कांबळे अशी लाच घेणाऱ्या तीन पोलिसांची नावे आहेत. जप्त केलेला टेम्पो परत करण्यासाठी 50 हजारांची लाच त्यांनी मागितली होती. याबाबतची तक्रार त्यांच्याविरोधात देण्यात आली होती. यापैकी काही रक्कम स्वीकारताना रांगेहाथ त्यांना पकडण्यात आलं.  त्यानंतर गांधीनगर पोलिस ठाण्यामध्ये तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

काय आहे नेमक प्रकरण?
 
तक्रारदार आणि त्यांचा मित्र जनावरे वाहतुकीचा व्यवसाय आहे. काही दिवसांपूर्वी जनावराच्या वाहतूक करणाऱ्या या टेम्पोवर गांधीनगर पोलिसांनी कारवाई केली होती. वाहतूक प्रकरणात संबंधीत व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर हा टेम्पो सोडवण्यासाठी मालकाने धडपड सुरु केली. दरम्यान या प्रकरणात तत्कालीन गांधीनगर पोलीस ठाण्यातील एपीआय दीपक जाधव, पीएसआय आबासाहेब शिरगारे, कॉन्सटेबल सतीश कांबळे यांनी टेम्पो पकडलेला मालक आणि तक्रारदार यांच्याकडे 50 हजार रुपयांची लाच मागितल्याचे तक्रारीत म्हटले आहे. 

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - आई अन् मुलगा लाइफ जॅकेटसाठी बोटीच्या खाली गेले, पण..; मुंबई बोट अपघाताचं धक्कादायक वास्तव

तीन टप्प्यात लाच देण्याची डील

25 नोव्हेंबर रोजी शिरगारे आणि तक्रारदार यांच्यात टेम्पो सोडवण्यासाठीची चर्चा झाली. त्यानंतर हे प्रकरण सुरु झाले. ही लाच तीन टप्प्यात देण्याचे ठरलेले होते. त्यानुसार काही रकमेचे पैसे दोन वेळा देण्यात आले. दीपक जाधव यांनी तक्रारदार अटकेत असताना गुन्ह्यात मदतीसाठी पैसे घेतलेची कबुली दिली आहे. गुन्ह्यात मदत करतो असे सांगत उर्वरित 35 हजारांची मागणी केली असल्याचे तक्रारीत नोंद करण्यात आली आहे.  

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - फिरायला आले, होत्याचं नव्हतं झालं... बोट दुर्घटनेत एकाच कुटुंबातील तिघांचा अंत

लाचलुचपत विभागाचा सापळा 

या लाच प्रकरणातील उर्वरित रक्कम तिसऱ्या वेळी देण्यात येणार होती. मात्र याच दरम्यान लाचलुचपत विभागाला याची माहिती मिळाली. त्यानुसार तपास पथकांनी सापळा रचला. अखेर तिसऱ्या वेळी पैसे घेत असताना लाचलुचपत विभागाने तीनही पोलीस कर्मचाऱ्यांना रंगेहाथ पकडले. कोल्हापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिस उप अधीक्षक वैष्णवी पाटील याच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक बापू साळुंके यांच्या पथकाने कारवाई केली.

Advertisement