जाहिरात

फिरायला आले, होत्याचं नव्हतं झालं... बोट दुर्घटनेत एकाच कुटुंबातील तिघांचा अंत

मुंबईच्या बोट दुर्घटनेने नाशिक जिल्ह्यातील पिंपळगावमधील आहेर कुटुंबातील दांपत्यासह चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. आई- वडिल आणि चिमुकल्या मुलाच्या मृत्यूने आहेर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे

फिरायला आले, होत्याचं नव्हतं झालं... बोट दुर्घटनेत एकाच कुटुंबातील तिघांचा अंत

मुंबई: मुंबईच्या गेट वे ऑफ इंडियावरुन एलिफंटा येथे जाणारी बोट बुडाल्याची दुर्दैवी घटना बुधवारी (18, डिसेंबर) घडली. या भीषण दुर्घटनेत 13 जणांचा मृत्यू झाला असून 90 हून अधिक प्रवासी जखमी झालेत. कुटुंबियांसोबत पर्यटनासाठी आलेल्या अनेकांना या दुर्घटनेत जीव गमवावा लागला. यामध्ये आता एक काळीज पिळवटून टाकणारी माहिती समोर आली असून नाशिकमधील एका दांपत्याचा चिमुकल्या बाळासह दुर्दैवी अंत झाला आहे. 

याबाबत सविस्तर माहिती अशी की, मुंबईच्या बोट दुर्घटनेने नाशिक जिल्ह्यातील पिंपळगावमधील आहेर कुटुंबातील दांपत्यासह चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. आई- वडिल आणि चिमुकल्या मुलाच्या मृत्यूने आहेर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. राकेश आहेर व हर्षदा आहेर असे या दांपत्याचे नाव असून निधेश आहेर असं त्यांच्या चिमुकल्या बाळाचे नाव आहे. 

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

दम्याच्या आजारावर उपचारासाठी पिंपळगांवच्या राकेश नाना आहेर हे दोन दिवसापुर्वी पत्नी व मुलासह मुंबईत आले होते. रूग्णालयात वैद्यकीय उपचार घेऊन ते बुधवारी सायंकाळी  मुबंईच्या गेट वे ऑफ इंडियाजवळ प्रवासी बोटने समुद्र सफारीचा आनंद घेण्यासाठी गेले. पण नौदलाच्या स्पीड बोटने प्रवासी बोटला दिलेल्या धडकेनंतर झालेल्या दुर्घटनेत या तिघांचाही दुर्दैवी अंत झाला. 

पत्नी आणि चिमुकल्यासोबत बोटीने समुद्र सफरीचा आनंद लुटण्यासाठी आलेलं हे हसत- खेळतं कुटुंब संपल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. मन सुन्न करणाऱ्या या घटनेने ने पिंपळगाव बसवंतच्या आहेर कुटुंबियावर दुखाचा डोंगर कोसळला आहे. 

नक्की वाचा - समुद्रात वेगाने फिरली अन् नेव्हीची स्पीड बोट थेट प्रवासी नौकेला धडकली, अपघाताचा थरारक Video समोर

दरम्यान,  गेट वे ऑफ इंडिया जवळ काल जी बोट दुर्घटना घडली, त्या दुर्घटनेनंतर सकाळी सात वाजता पहिली बोट मांडवाच्या दिशेने निघाली. या दुर्घटनेनंतर बोट मध्ये जाणाऱ्या सर्व प्रवाशांची काळजी घेतली जात आहे.

सर्व प्रवाशांना लाईफ जॅकेट दिले जात असून, किती प्रवासी बोट मध्ये भरले असून किती प्रवास करतात याची देखील नोंद घेतली जात आहेत. त्यामुळे दुर्घटनेनंतर आता इथल्या स्थानिक काम करणाऱ्यांना जाग आल्याचे चित्र दिसून येत आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: