Nashik News : 14 व्या प्रसुतीनंतर 45 वर्षीय महिलेचं घृणास्पद कृत्य उघड? नाशिककर हादरले

आई पोटच्या लेकराला वाढविण्यासाठी ती स्वत:च्या पोटाला चिमटा काढून जगते. मात्र नाशिकच्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातील एक महिला आपलं मातृत्व विकून घर चालवत असल्याचं समोर आलं आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

Nashik News : नाशिकमधील एका ४५ वर्षीय महिलेने केलेल्या कृत्यानंतर जिल्ह्यातून संताप व्यक्त केला जात आहे. मूल हा एखाद्या महिलेसाठी आनंददायी क्षण असतो. पोटच्या लेकराला वाढविण्यासाठी ती स्वत:च्या पोटाला चिमटा काढून जगते. मात्र नाशिकच्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातील एक महिला आपलं मातृत्व विकून घर चालवत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

नेमकं काय आहे प्रकरण? 

नाशिकच्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातील टाके देवगाव बरड्याची वाडी या आदिवासी पाडयावर राहणाऱ्या बच्चुबाई विष्णू हंडोगे या 45 वर्षीय महिलने तब्बल 14 मुला मुलींना जन्म दिला होता. वयाच्या ४५ व्या वर्षी या महिलेला १४ मूलं होती. घराची परिस्थिती बेताची होती. पैशांसाठी १४ पैकी काही मुला मुलींची विक्री करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात  आहे. 10 ऑक्टोबर 2025 ला महिलेला बाळ झालं. यंदा मुलगा झाला होता. या मुलाचं  वजन कमी असल्याने आरोग्य विभागाने तिच्या घरी आशा कर्मचाऱ्यांना पाठवलं. तिथे जाताच आरोग्य विभागाला संशय आला. महिलेने बाळ नसल्याचं सांगितलं. त्यानंतर काही तरी विचित्र असल्याचं उघडकीस आलं.  दरम्यान या प्रकरणी चौकशीची मागणी सामाजिक कार्यकर्त्यांकडून केली जाते आहे. 

नक्की वाचा - Nashik : महिन्याला 4 कोटींची कमाई; सरकारी कर्मचाऱ्यांकडून मदत; Nashik Call Center मध्ये दडलंय मोठं घबाड

काहींच्या माहितीनुसार, या महिलेने १४ पैकी ६ मुलं-मुली विकल्याचा संशय आहे. तर घरातील मुलांनी सांगितलं, भाऊ घरात नसल्याचं सांगितलं. दरम्यान या प्रकरणाची अधिक चौकशी होत आहे. 

Advertisement
Topics mentioned in this article