जाहिरात

Akola News : पोलीस ठाण्यात 5 वर्षांच्या चिमुकलीचा मृतदेह, पोलीसही चक्रावले; सोशल मीडियावर व्हायरल व्हिडिओचं सत्य उघड

 हा प्रकार अकोल्याच्या सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात घडला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीवरून हा सर्व प्रकार दोन कुटुंबात झालेल्या वादावरूनच घडला आहे. 

Akola News : पोलीस ठाण्यात 5 वर्षांच्या चिमुकलीचा मृतदेह, पोलीसही चक्रावले; सोशल मीडियावर व्हायरल व्हिडिओचं सत्य उघड

योगेश शिरसाट, प्रतिनिधी

अकोल्यात एका लहान मुलीचा मृतदेह पोलीस स्टेशनला आणल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. यासंदर्भातील व्हिडिओ सुद्धा सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. सुरुवातील नेमका प्रकार काय हे पोलिसांनाही कळालं नाही. परी नावाच्या एका चिमुकलीचा मृतदेह पाहून पोलिसांनाही धक्का बसला. हा प्रकार अकोल्याच्या सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात घडला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीवरून हा सर्व प्रकार दोन कुटुंबात झालेल्या वादावरूनच घडला आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

अकोला शहरातील आंबेडकर नगर येथे अंजनगावकर आणि कंकाळ या शेजाऱ्यांमध्ये वाद झाला होता. वडील आपल्या कुटुंबाला घेऊन अकोल्याच्या बाहेर एका खेडेगावात रात्री मंगळवारच्या रात्री निघाले. त्याच वेळी जात असताना दुचाकीला अपघात झाला. या अपघातात बाप लेकीला जबर मार लागला. यानंतर ते लेकीला घेऊन अकोल्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय गाठलं. येथे डॉक्टरांनी परीला मृत म्हणून घोषित केलं. 

Vasai News : आग पाहण्यासाठी रस्त्यावर गेला अन् जागीच मृत्यू; मुंबई अहमदाबाद महामार्गावरील धक्कादायक घटना

नक्की वाचा - Vasai News : आग पाहण्यासाठी रस्त्यावर गेला अन् जागीच मृत्यू; मुंबई अहमदाबाद महामार्गावरील धक्कादायक घटना

दरम्यान या घटनेनंतर परीच्या कुटुंबीयांनी तिचा मृतदेह घेऊन थेट अकोल्याच्या सिव्हील लाईन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. मात्र अचानक पाच वर्षीय मुलीचा मृतदेह पोलीस स्टेशनला आणल्याने पोलीसही चक्रावून गेले. नेमका प्रकार झाला तरी काय... पोलिसांनी सर्व हकीकत ऐकल्यानंतर मृतदेहाची अवहेलना होऊ नये म्हणून तिचा पोस्टमार्टम करण्यासाठी पुन्हा सरकारी रुग्णालयात पाठवलं. दरम्यान पोस्टमार्टम केल्यानंतर पुन्हा दोन तासांनी अंजनगावकर कुटुंबीय परीचा मृतदेह घेऊन पोलीस ठाण्यात आले. आंबेडकर नगर येथे झालेल्या वादावरूनच आमच्या मुलीचा मृत्यू झाला. त्यामुळे दोषींवर कारवाई करा अशी मागणी परीच्या कुटुंबीयांनी केली.

शहरात दोन गटात झालेल्या किरकोळ वादातून हा मृत्यू झाला नसल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. दरम्यान यावेळीचे व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालेत. आणि याची दखल घेत शहराचे उपविभागी पोलीस अधिकारी सतीश कुलकर्णी ही पोलीस ठाण्यात दाखल झाले आहेत. कुटुंबीयांचा रडण्याचा आक्रोश सुरू होता. यावेळी शहर उपविभागीय पोलीस अधिकारी सतीश कुलकर्णी यांनी मृत परीच्या कुटुंबीयांना मृतदेहावर अंतिमसंस्कार करा असं म्हटलं. कारवाईचे आश्वासन दिल्यावर तिच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com