6 महिन्याच्या बाळाचे अपहरण,'ते' 6 जण अन् 26 लाखाची किंमत

सहा जणाच्या अटकेनंतर या बाळाच्या अपहरणाची कहाणी समोर आली आहे. ती अतिशय धक्कादायक आहे. ही कहाणी ऐकून पोलिस देखील चक्रावले आहेत.

Advertisement
Read Time: 3 mins
कल्याण:

अमजद खान 

मध्य प्रदेशात एका सहा महिन्याच्या बाळाचे अपहरण झाले. जेव्हा पोलिसांनी अपहरणकर्त्यांना ताब्यात घेतले. त्यानंतर जे खुलासे झाले. ते अतिशय धक्कादायक आहेत. महाराष्ट्रातील एका शिक्षकाला सहा महिन्याचे बाळ पाहिजे होते. त्यासाठी त्याने 29 लाख रुपये खर्च केले. या प्रकरणात कल्याण पोलिसांनी एकूण सहा जणांना अटक केली आहे. यामध्ये मुंबईतील एका नामांकित रुग्णालयात काम करणारा अटेण्डंट, शेअर बाजारात काम करणारी त्याची पत्नी , एक रिक्षा चालक, या  रिक्षा चालकाच्या शेजारी राहणारे दांम्पत्य आणि शिक्षकाला अटक केली आहे. अपहरण करण्यात आलेल्या बाळाची पोलिसांनी सुटका केली आहे.

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

अपहरण कसे झाले? 

या अपहरणाची लिंक अगदी मध्य प्रदेशपासून आहे.  6 मे ला रात्री मध्यप्रदेश येथील  रिवा जिल्ह्यातील सीव्हल लाईन पोलिस ठाण्याच्या हद्दीतून रस्त्यावरुन एका बाळाचे अपहरण झाले. फेरीचे काम करणारे एक दांम्पत्य रस्त्यावरील फूटपाथवर झोपले होते. त्याच वेळी दोन बाईक स्वार या दप्म्पत्याजवळ आले. त्यांनी 6 महिन्याच्या बाळाला जबदरस्तीने उलचून पळ काढला. त्यानंतर या प्रकरणाची तक्रार सीव्हील लाईन पोलिस ठाण्यात नोंदवण्यात आली. पोलिसांनी त्वरीत सीसीटीव्हीच्या सहाय्याने बाळाच्या अपहरण करणाऱ्यांना ताब्यात घेतले. मात्र तोपर्यंत सहा महिन्याचे बाळ महाराष्ट्रात आणले गेले होते. अपहरणकर्त्यांनी नितीन सोनी आणि स्वाती सोनी या दांम्पत्याला हे बाळ दिल्याचे सांगितले.  

Advertisement

हेही वाचा - दाभोलकर हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधारांना शिक्षा कधी? न्यायालयाच्या निकालाला चॅलेंज करणार 

मध्य प्रदेशातून बाळ थेट कल्याणध्ये 

सोनी दांम्पत्य कल्याणला राहता होते. मध्यप्रदेश पोलिसांनाही माहिती मिळाली. त्यांनी लगेचच कल्याण पोलिसांशी संपर्क केला. मध्य प्रदेश  पोलिस कल्याणला पोहचले. डीसीपी सचिन गुंजाळ, एसीपी कल्याणजी घेटे आणि खडकपाडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक डॉ अमरनाथ वाघमोड यांनी सहा महिन्याच्या बाळाच्या सुटकेसाठी सहा पथके तयार केली. कल्याणच्या खडकापाडा पोलिसांनी नितीन आणि स्वाती सोनी या दोघांना ताब्यात घेतले. त्यांनी सांगितले की, हे बाळ आमच्या शेजारी राहणारे रिक्षा चालक प्रदीप कोळंबेला देण्यात आले आहे. पोलिसांनी प्रदीप कोळंबेला ताब्यात घेतले. प्रदीपने सांगितले की, हे बाळ अमोल येरुणकर आणि त्याची पत्नी अर्वी येरुणकरला देण्यात आले आहे.

Advertisement

हेही वाचा - नाशिकमध्ये महायुतीला मोठा धक्का? अजित पवार गटाचा बडा नेता शरद पवार गटाच्या उमेदवाराच्या प्रचारात

बाळाचा कल्याण ते पोलादपूर प्रवास   

पोलिसांनी येरुणकर पती पत्नीला ताब्यात घेतले. त्यांनी सांगितले की, सहा महिन्याचे बाळ रायगड येथील पोलादपूरमध्ये राहणारे शिक्षक श्रीकृष्ण पाटील यांना दिले आहे. पोलिसांनी शिक्षक पाटील याला ताब्यात घेऊन त्याच्या जवळ असलेल्या बाळाची सुटका केली आहे. 

Advertisement

बाळाच्या अपहरणाची कहाणी

सहा जणाच्या अटकेनंतर या बाळाच्या अपहरणाची कहाणी समोर आली आहे. ती अतिशय धक्कादायक आहे. ही कहाणी ऐकून पोलिस देखील चक्रावले आहेत. रायगड येथील पोलादपूरमध्ये राहणारे शिक्षक पाटील यांना वयाच्या ५३ वर्षीही मुल झाले नव्हते. त्यांनी आपल्या एका ओळखीच्या व्यक्ती, जो एकेकाळी त्यांचा विद्यार्थी होता. अमोल येरुणकरला ही बाब सांगितली. शिवाय एक बाळ आपल्याला हवे आहे. सहा ते सात महिन्याचे ते असावे असेही सांगितले. अमोल हा मुंबईतील एका नामांकित रुग्णलायात अटेंण्डट आहे. रुग्णालयातून बाळ मी चोरी करुन देतो असे आश्वासन त्याने पाटील यांना दिले. त्यासाठी 29 लाख रुपये घेतले. पैसे घेतल्यानंतर त्याला बाळ काही मिळत नव्हते. अमोल यांनी ही बाब आपली पत्नी आर्वी हीला सांगितले. ती  शेअर बाजारात काम करत होती. आर्वी दररोज ज्या रिक्षाने प्रवास करीत होती. त्या रिक्षा चालकास एका बाळाची गरज आहे असे सांगितले. त्याबदल्यात भरपूर पैसे मिळते. रिक्षा चालकाने त्यांच्या शेजारी राहणाऱ्या सोनी दांपत्यास पैशाचे आमिष दाखवून एक बाळ उपलब्ध करुन द्या असे सांगितले. सोनी दांपत्य हे मध्य प्रदेशचे असल्याने त्याने रिक्षा चालकासोबत जाऊन, रेकी केली. त्यानंतर बाळाच्या अपहरणाचा कट रचला. येरुणकर कुटुंबीयांनी बाळासाठी घेतलेल्या पैशातून एक घर विकत घेतले आहे. या सहा आरोपींना मध्य प्रदेश पोलिसांच्या हवाली केले आहे. बाळालाही मध्य प्रदेश पोलिसांकडे सूपूर्द केले आहे. पोलिस त्या बाळाला त्याच्या पालकांच्या स्वाधिन करणार आहेत.