Baramati News: मानवतेला काळीमा फासणारी घटना, मेंढपाळ कुटुंबावर भ्याड हल्ला, 7 नराधमांनी केला विनयभंग

करमाळा तालुक्यातील वरकटणे येथे बारामतीतील एका मेंढपाळ कुटुंबाला सात जणांनी बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. विनयभंर आणि पोक्से अंतर्गत सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
Baramat Shepherd Family Crime News Today

देवा राखुंडे, प्रतिनिधी 

Baramati Crime News : करमाळा तालुक्यातील वरकटणे येथे बारामतीतील एका मेंढपाळ कुटुंबाला सात जणांनी बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात एका मेंढपाळ महिलेच्या डोळ्याला गंभीर इजा झाली असून कुटुंबातील इतर सदस्यही जखमी झाले आहेत. याप्रकरणी करमाळा पोलिसांनी सात जणांविरुद्ध विनयभंग,पोक्सो आणि इतर गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

या घटनेची दखल घेत ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी बारामती येथील शासकीय रुग्णालयात जाऊन जखमींची भेट घेतली."हा हल्ला मानवतेला काळीमा फासणारा भ्याड हल्ला आहे,"असे सांगत लक्ष्मण हाकेंनी संताप व्यक्त केला.  करमाळा येथे मेंढपाळ बांधवांवर काही दिवसांपूर्वी दुर्दैवी हल्ला झाला होता. यात काही जण गंभीर जखमी झाले. सध्या या जखमींवर बारामतीमधील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. लक्ष्मण हाके यांनी रूग्णालय जाऊन कुटुंबाची भेट घेत विचारपूस केली.

Advertisement

नक्की वाचा >>  CM Devendra Fadnavis: जपानी मेंदूज्वराविरोधात महाराष्ट्र सतर्क; राज्यातील सद्यस्थिती काय? A To Z माहिती वाचा

लक्ष्मण हाकेंनी जखमींची भेट घेतली अन्..

हाके यांनी जखमी चंदाबाई मोटे यांची भेट घेतली आणि त्यांची प्रकृती जाणून घेतली. डॉक्टरांशी चर्चा करून त्यांच्या उपचाराबाबत सविस्तर माहिती घेतली. अशा घटना वारंवार घडत आहेत, याकडे गांभीर्याने पाहिले पाहिजे. जखमी बांधवांना लवकरात लवकर बरे व्हावे, यासाठी मी प्रार्थना करतो असे हाके म्हणाले. 

नक्की वाचा >> Jalgaon News: भोंदूबाबाची पत्नी मुंबई पोलिसात, दोघांनी मिळून महिलेला 11 लाखांना गंडवलं, अघोरी पूजा-करणी अन्..

डॉक्टरांकडून मिळालेल्या माहितीनुसार जखमींना आवश्यक ते सर्व उपचार देण्यात येत आहेत. आतापर्यंत 7 आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांच्यावर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पण हा हल्ला भ्याड स्वरूपाचा आहे. इथल्या व्यवस्थेला विचार करायला लावणारा हल्ला आहे. महिलांवर आणि लहान लेकीबाळींवर अत्याचार सहन केले जाणार नाहीत असेही हाके म्हणाले.