Crime News : पती-पत्नीच्या नात्यात संशयाचा किडा शिरला तर अख्ख नातंच पोखरुन टाकतं. मग हे कोणत्याही वयात होऊ शकतं. अगदी तरुणपणात किंवा म्हातारपणातसुद्धा. केरळमधून असाच एक प्रकार समोर आला आहे. येथे एक महिला आपल्या 91 वर्षांच्या पतीवर संशय घेत होती. यामुळे पती प्रचंड चिडला होता. या रागात त्याने पत्नीचा जीव घेण्याचा प्रयत्न केल्याची माहिती आहे. शेवटी हे प्रकरण कोर्टात गेलं त्यानंतर याचा खुलासा झाला.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
केरळ उच्च न्यायालयाने पत्नीवर सुऱ्याने हल्ला करणाऱ्या 91 वर्षीय थेवन याला हत्येचा प्रयत्न करण्याच्या गुन्हात जामीन दिला आहे. उच्च न्यायालयाने सांगितलं की, वृद्धापकाळात केवळ पत्नीच तुम्हाला साथ देईल. त्यामुळे या काळात आपल्या पत्नीवर विश्वास ठेवा. दोघंही आनंदाने जगा.
नक्की वाचा - Nagpur Crime : संशय, वाद अन् लोखंडी रॉड; नागपुरातील महिला डॉक्टर प्राध्यापिकेच्या हत्येचं गूढ उलगडलं
मिळालेल्या माहितीनुसार, थेवनने आपल्या पत्नीवर चाकू हल्ला केला होता. पत्नीने थेवनवर संशय घेतला होता. थेवनचे दुसऱ्या महिलेसोबत संबंध असल्याच्या संशयातून दोघांमध्ये वाद झाला. यानंतर थेवनने आपली पत्नी कुंजलीवर चाकूने हल्ला केला. यामुळे ती गंभीर जखमी झाली आहे. पत्नी थेवनवर दुसऱ्या महिलेसोबत संबंध असल्याचा संशय घेत होती. त्यामुळे थेवन त्रस्त झाला होता. यातून दोघांमधील वाद वाढला आणि थेवनने पत्नीवर चाकूने हल्ला केला.