घरगुती भांडण झाल्याने ती वैतागली होती. शांतता मिळावी म्हणून ही विवाहित तरूणी डायघरजवळील शीळ फाटा गणेश घोळ मंदिरात (Shilphata Ganesh Temple) गेली होती. येथे मंदिर सांभाळण्यासाठी उत्तर प्रदेश येथून आलेल्या तीन पुजाऱ्यांनी तिच्यावर आळीपाळीने बलात्कार करत तिचा खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. (Rape in Temple)
मंदिराचे मुख्य पुजारी बालक महाराज उत्तर प्रदेश येथे आपल्या गावी गेल्याने काही दिवस गणेश घोळ मंदिर सांभाळण्यासाठी श्यामसुंदर शर्मा, संतोष कुमार मिश्रा आणि राजकुमार पांडे या तीन पुजाऱ्यांना गावाहून बोलावून घेतले होते. 6 जुलै रोजी बेलापूर येथे राहणारी तीस वर्षीय महिला घरगुती ताणतणाव असल्याने सकाळी 10 वाजता गणेश घोळ मंदिरात गेली होती.
दिवसभर ही महिला त्याच मंदिरात बसून होती. येथील पुजाऱ्यांनी तिला दुपारचं जेवण दिलं. त्यानंतर संध्याकाळचा चहा देताना या चहामध्ये त्यांनी भांगेची गोळी मिसळून दिली. हा चहा प्यायला नंतर मुलीची शुद्ध हरपली आणि रात्रभर ही महिला या मंदिरातच राहिली. दरम्यान या तीन पुजाऱ्यांनी आळीपाळीने तिच्यावर बलात्कार केला. पहाटे शुद्ध आल्यानंतर या महिलेला आपल्यासोबत काहीतरी भयंकर घडल्याचं लक्षात आल्यानंतर तिने आरडाओरडा करण्यास सुरुवात केली.
नक्की वाचा - VIDEO : हातात बंदूक, सोबत बाऊन्सर...जमिनीसाठी शेतकऱ्यांना धमकी; पूजा खेडकरांच्या आईचा प्रताप
मात्र आपले बिंग फुटेल हे पुजाऱ्यांना समजताच यांनी तिला मारहाण करत जमिनीवर आपटलं आणि तिचा खून केला. त्यानंतर तिचा मृतदेह मंदिराच्या बाजूला असलेल्या जंगलात फेकून दिला. दोन दिवसांनी मंदिरात गेलेल्या एका भक्ताला डोंगरावर जंगलात पडलेला तिचा मृतदेह दिसला. यासंदर्भात त्यांनी पोलिसांना माहिती दिल्यानंतर तत्काळ पोलीस घटनास्थळी दाखल झाले. सीसीटीव्ही तपासल्यानंतर पोलिसांना पुजाऱ्याचा संशय आला.
पुजाऱ्यांना विचारपूस केली असता त्यांनी या घटनेची कबुली देत आमच्याबरोबर आणखीन एक आरोपी असल्याचे सांगितले. मात्र पोलीस स्थानकात जाताक्षणी आरोपीने मुंबई येथे पळ काढण्याची माहिती देखील इतर दोन पुजारांनी दिली. त्यानंतर पोलिसांनी आपली सूत्रे हलवत शर्मा याला चिता कॅम्प ट्रॉम्बे येथून अटक केली. दरम्यान श्यामसुंदर शर्मा, संतोष कुमार मिश्रा, राजकुमार पांडे या तीन आरोपींना ताब्यात घेतले. अधिक तपास डायघर पोलीस करत आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world