लातून हादरले ! घरात घुसून 40 वर्षीय नराधमाचा चिमुरडीवर अत्याचार

40 वर्षीय नराधमाने हे अत्याचार केले. बाळू उर्फ श्रीकांत आप्पाराव डब्बे असं अत्याचार करणाऱ्या नराधमाचे नाव आहे. हा नराधम पिडीत चिमुरडीच्या घरा शेजारीच राहात होता.

Advertisement
Read Time: 2 mins
लातूर:

सुनील कांबळे 

जिल्ह्या एका घटनेने हादरून गेला आहे. जिल्ह्यातल्या देवणी तालुक्यात एका आठ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आले आहेत.  40 वर्षीय नराधमाने हे अत्याचार केले. बाळू उर्फ श्रीकांत आप्पाराव डब्बे असं अत्याचार करणाऱ्या नराधमाचे नाव आहे. हा नराधम पिडीत चिमुरडीच्या घरा शेजारीच राहात होता. ही पिडीत चिमुरडी तिसऱ्या वर्गात शिकते. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

नराधम बाळू उर्फ श्रीकांत डब्बे हा पिडीत चिमुरडीच्या घरा शेजारी राहातो. त्याला दारू पिण्याची सवय आहे. तो मद्यधुंद अवस्थेत होता. चिमुरडी एकटी घरात असल्याचे त्याने पाहीले. त्याच वेळी त्याने डाव साधला. ती एकटी असल्याचा गैरफायदा त्याने घेतला. त्याने त्या चिमुरडीवर अत्याचार केले. ही घटना उघड झाल्यानंतर त्या चिमुरडीला तात्काळ उदगीरच्या रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तीच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. या प्रकरणी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत नराधमाला बेड्या ठोकल्या आहे. त्याविरूद्ध बाल लैंगिक शोषण कायद्या नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर लातूर जिल्हा हादरून गेला आहे.  

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - वरळीत हिट अँड रन प्रकरणी शिंदे गटाचा नेता पोलिसांच्या ताब्यात, तर मुलासह दोघांना अटक

या घटनेनंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात टिकेची झोड उठली आहे. शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष केले आहे. त्यांनी या घटनेनंतर आपल्या फेसबूक पोस्टमधून फडणवीसांना काही प्रश्न विचारले आहेत. फडणवीस साहेब, लाडक्या बहिणींवर कुठे भर रस्त्यामध्ये सपासप चाकूने वार केले जात आहेत. पुण्यासारख्या ठिकाणी पोलीस कर्मचारी असणाऱ्या लाडक्या बहिणीवर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न होतोय. तर आज येणकी ता.उदगीर जि. लातूर लाडक्या बहिणीच्या आठ वर्षाच्या चिमुरडीवर  बाळू नावाच्या चाळीस वर्षीय नराधमाने बलात्कार केलाय. साहेब ,बहिणीला पंधराशे रुपयाची खैरात देण्यापेक्षा बहीण आणि बहिणीच्या लेकीबाळी सुरक्षितपणे मोकळा श्वास घेऊ शकतील अशी परिस्थिती या राज्यात निर्माण करण्यासाठी प्रयत्न करा. उपकार होतील. आपली,
त्रस्त बहीण. अशा पद्धतीची पोस्ट अंधारे यांनी केली आहे. 

Advertisement