बंद दुकान सुरु करण्याचा प्रयत्न, औषध निरीक्षक सापडल्या जाळ्यात

Nalasopara News : नालासोपारमधील एका मेडिकल स्टोअरच्या मालकाकडून लाच मागितल्या प्रकरणी अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या निरीक्षक आरती कांबळी यांना अँटी करप्शननं अटक केलीय.

Advertisement
Read Time: 1 min
नालासोपारा:


मनोज सातवी, प्रतिनिधी

नालासोपारमधील एका मेडिकल स्टोअरच्या मालकाकडून लाच मागितल्या प्रकरणी अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या निरीक्षक आरती कांबळी यांना अँटी करप्शननं अटक केलीय. साळवी यांच्यावर मेडिकल स्टोअर मालकाकडून 1 लाखांची लाच मागितल्याचा आरोप आहे. या कारवाईमध्ये कांबळी यांच्यासह कृष्णकुमार तिवारी या एका व्यक्तीला अटक करण्यात आलीय. 

ट्रेंडींग बातमी - अहमदनगरच्या आयुक्तांचं घर ACB कडून सील! आयुक्त जावळे फरार

काय आहे प्रकरण?

काही दिवसांपूर्वी कारवाई करून बंद केलेले मेडिकल स्टोअर पुन्हा सुरू करण्यासाठी कांबळी यांच्या सांगण्यावरून कृष्णकुमार तिवारी या इसमाने मेडिकल स्टोअरच्या मालकाकडे एक लाख रुपयाच्या लाचेची मागणी केली होती. याबाबत संबंधित मेडिकल स्टोअर मालकाने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. त्यानंतर एसीबीने  लावलेल्या सापळ्यात आरती कांबळी यांच्या सांगण्यावरून कृष्णकुमार तिवारीनं लाच स्वीकारली.  त्यानंतर ACB नं तिवारी आणि कांबळी या दोघांनाही अटक केलीय. 

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )