Beed Crime : बीड जिल्ह्यात आणखी एका सरपंचाचा मृत्यू, जिल्हा पुन्हा हादरला! 

बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण ताजं असताना बीड जिल्ह्यातील आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.

जाहिरात
Read Time: 1 min

बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण ताजं असताना बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. अंबेजोगाई तालुक्यातील सौंदाना गावातील सरपंचाचा मृत्यू झाला आहे. अभिमन्यू क्षीरसागर असं मृत्यू झालेल्या सरपंचाचं नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार राखेची वाहतूक करणाऱ्या चालकाने सरपंचाच्या दुचाकीला उडवलं. यात सौंदाना गावचे सरपंच अभिमन्यू क्षीरसागर यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर गावभरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. 

नक्की वाचा - Walmik Karad : "पोते भरुन पैसा, 140 जणांकडून कोट्यवधी हडपले", वाल्मिक कराडचा नवा कारनामा उघड

मिळालेल्या माहितीनुसार, सरपंचा अभिमन्यू क्षीरसागर दुचाकीवरुन जात होते. त्यावेळी राखेची वाहतूक करणाऱ्या टिप्परने त्यांना धडक दिली. यातच त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. बीडमधील संतोष देशमुख यांच्या हत्येचं प्रकरण समोर असताना महिनाभरात दुसऱ्या एका सरपंचाचा मृत्यू झाल्याने बीड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.