अमजद खान, प्रतिनिधी
प्रलंबित खटले हे देशातील सर्वच न्यायालयांसमोरील मोठी समस्या आहे. प्रलंबित खटल्यांमुळे अनेक आरोपी तुरुंगात खितपत पडून आहेत. त्यांच्या भवितव्याचा निर्णय सतत लांबणीवर पडतोय. कोर्टात 'तारीख पे तारीख' या चक्रात असलेल्या एका आरोपीनं भर न्यायालयात न्यायाधीशांच्या दिशेनं चप्पल भिरकावल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काय आहे प्रकरण?
कल्याणमधील कोर्टात हा धक्कादायक प्रकार आहे. चार वर्षापासून जेलमध्ये बंदी असलेल्या आरोपीने कल्याण काेर्टात न्यायधीशाच्या दिशेने चप्पल भिरकावली. या प्रकरणात महात्मा फुले पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. किरण भरम असे या आरोपीचे नाव आहे. पोलिस पुढील तपास करीत आहेत.
कल्याण कोर्टात शनिवारी गर्दी होती. कारण कोर्टात खडकपाडा पोलिस योगीधाम प्रकरणातील आरोपी अखिलेश शुक्ला, त्याची पत्नी गीता यांच्यासह चार आरोपीना कोर्टात हजर करणार होते. कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांनी बंदोबस्त तैनात केला होता. सर्व ठिकाणी पा्ेलिस होते. प्रसार माध्यमाचे प्रतिनिधी कोर्टात होती. यावेळी कोर्टात हलचाल सुरु झाली. काही वकिल बाहेर आले. त्यांनी पत्रकारांना काही माहिती दिली. कल्याण न्यायालयाचे न्यायाधीश आर.जी. वाघमारे यांच्या कोर्टात एक अजबच प्रकार घडला.
( नक्की वाचा : कल्याणच्या मराठी कुटुंबाला मारहाण करणाऱ्या अखिलेशचा खेळ समाप्त )
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किरण भरम हा आरोपी गेल्या चार वर्षापासून आधारवाडी जेलमध्ये आहे. खडकपाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका हत्येच्या प्रकरणात त्याला अटक केली होती. तेव्हापासून तो जेलमध्ये आहे. त्याची आज सुनावणीची तारीख होती. तारखेची सुनावणी संपली होती. न्यायाधीशांनी पोलिसांना आरोपीस घेऊन जाण्यास सांगितले. त्याच वेळी आरोपी किरण भरम याने जोरात बोलला की, माझी केस संपवा. मला मोकळे करा.
भरमेनं त्याच्या पायातील चप्पल काढून त्याने न्यायाधीशांच्या दिशेने भिरकावली. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली. सध्या या प्रकरणात किरण भरम याच्या विरोधात गुन्हा दाखल होणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.