अभिनेत्री लैला खान-कुटुंब हत्याकांडात सावत्र वडिलांना फाशीची शिक्षा, न्यायालयाचा मोठा निर्णय

मुंबई सत्र न्यायालयाने अभिनेत्री लैला खान आणि कुटुंबाची हत्या केल्या प्रकरणात मोठा निर्णय घेतला आहे.

जाहिरात
Read Time: 1 min
मुंबई:

मुंबई सत्र न्यायालयाने अभिनेत्री लैला खान आणि कुटुंबाची हत्या केल्या प्रकरणात मोठा निर्णय घेतला आहे. या प्रकरणात न्यायालयाने लैला खानचे सावत्र वडील परवेज टाक याला फाशीची शिक्षा सुनावली आहे. 

तब्बल 14 वर्षे जुन्या लैला खान हत्या प्रकरणात दोषी परवेजने लैला खान, तिची आई आणि चार भाऊ-बहिणी अशी मिळून सहा जणांची हत्या केली होती. यानंतर सर्वांचे मृतदेह त्यांच्या फार्म हाऊसमध्ये पुरण्यात आले होते. यानंतर पोलिसांनी परवेजला ताब्यात घेतलं आणि चौकशी केली. यानंतर सर्व घटनाक्रम समोर आला. 

अचानक सर्वजण गायब झाल्यानंतर लैलाचे वडील नादिर पटेल यांनी मुंबईच्या ओशिवारा पोलीस ठाण्यात अपहरणाची तक्रार दाखल केली होती. परवेज आणि त्याचा साथीदार आसिफ शेख याने लैला आणि तिच्या संपुर्ण कुटुंबाचं अपहरण केल्याची तक्रार लैलाचे वडील पटेल यांनी केली होती. यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला आणि त्यांच्या फार्म हाऊसमधून मृतदेह ताब्यात घेतला. 

बातमी अपडेट होत आहे.