धक्कादायक! पनवेल महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांवर बलात्काराचा गुन्हा, बळजबरीने गर्भपात केल्याचाही आरोप

पनवेल महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त भारत राठोड यांच्यासह विशाल राठोड, राहुल नावाच्या त्याच्या साथीदारावर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जाहिरात
Read Time: 1 min

छत्रपती संभाजीनगर शहरातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. छत्रपती संभाजीनगर येथे पनवेल महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तासह तिघांवर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिन्ही आरोपींनी महिलेवर बलात्कार केला आणि ती गर्भवती झाल्यानंतर बळजबरीने महिलेचा गर्भपात केल्याचं तक्रारीत म्हटलं आहे.  भारत प्रभाकर राठोड असं अतिरिक्त आयुक्तांचं नाव आहे. (Panvel Municipal Corporation Bharat Rathod )

मिळालेल्या माहितीनुसार, पनवेल महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त भारत राठोड यांच्यावर लग्नाचं आमिष दाखवून 39 वर्षीय महिलेवर अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. यासंदर्भात संभाजीनगरच्या मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात पीडितेने तक्रार दाखल केली आहे. 

नक्की वाचा - ईडीच्या अधिकाऱ्यांना पाहताच घराचं दार बंद केलं; वसई-विरारचे माजी आयुक्त अनिल कुमार यांच्या घरावर छापा

पनवेल महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त भारत राठोड यांच्यासह विशाल राठोड, राहुल नावाच्या त्याच्या साथीदारावर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धक्कादायक म्हणजे तिन्ही वेळी आरोपीने बळजबरी महिलेचा गर्भपात केल्याचे महिलेने तक्रारीत म्हटले आहे.