
मनोज सातवी, प्रतिनिधी
वसई-विरारचे माजी आयुक्त अनिल कुमार पवार यांच्या शासकीय निवासस्थानावर ED ची कारवाई झाल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे ईडीच्या अधिकाऱ्यांना पाहताच अनिल कुमार पवार यांनी दरवाजा बंद ठेवून महत्त्वाचे पुरावे नष्ट केल्याचा आरोप केला जात आहे. पवार यांनी महत्त्वाचे कागदपत्र आणि रोख रक्कम नष्ट करून फ्लश केल्याची सूत्रांची माहिती आहे. ईडीच्या छाप्यात पवार यांच्याकडे कोणतं घबाड सापडतं याकडे सर्वांचे लक्ष..!
विशेष म्हणजे काल 28 जुलैला त्यांचा निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता. त्यास सर्व राजकीय पक्षाचे नेते आणि कार्यालयातले कर्मचारी हजर होते. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी अनिलकुमार पवार यांची ED कडून वसईतील शासकीय निवासस्थानी सकाळी सात वाजल्यापासून कसून चौकशी सुरू करण्यात आली.
वसई विरार शहर महानगरपालिकेच्या माजी आयुक्त अनिल कुमार पवार यांच्या शासकीय निवासस्थानावर आणि त्याचप्रमाणे त्यांच्याशी संबंधित नाशिक पुणे अशा एकूण 12 ठिकाणी ED ने मंगळवारी सकाळी सात वाजल्यापासून छापेमारी सुरू केली होती. मात्र वसई पश्चिमेच्या ज्या शासकीय निवासस्थानी माजी आयुक्त अनिल कुमार पवार होते, त्या ठिकाणी पवार यांनी सुरुवातीला ईडीच्या अधिकाऱ्यांना एक तास दरवाजा न उघडून रोखून धरलं होतं. त्यानंतर ईडीच्या अधिकाऱ्यांनी दरवाजा तोडून बंगल्यात प्रवेश केला.
नक्की वाचा - Eknath Khadse : खडसेंचे जावई दर आठवड्याला पार्टी करत होते, पोलीस तपासाचा वाचा Exclusive Report
मात्र त्याच एक तासाच्या काळात अनिल कुमार पवार यांनी बेहिशोबी मालमत्ता संदर्भातील महत्वाची कागदपत्रे तसेच, रोख रक्कम नष्ट करून फ्लश केल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. मंगळवारी सकाळी सात वाजल्यापासून सुरू झालेली ईडीची कारवाई बुधवारी पहाटे दीड वाजल्यानंतर ईडीचे अधिकारी या ठिकाणावरून निघून गेले.
यावेळी अधिकाऱ्यांनी काही महत्त्वाचे साहित्य आणि कागदपत्रे आपल्या सोबत नेल्याचे दिसून आले. परंतु अनिल कुमार पवार यांना ईडीच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतलेले नाही. जवळपास 19 ते 20 तास ही कारवाई सुरू असल्याची माहिती आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world