भाजपाच्या महिला नेत्यांनी, 'मला एका व्यक्तीकडून 7 लाख रुपये घ्यायचे आहेत, असं सांगितलं होतं.' त्यानंतर म्हणजेच 21 सप्टेंबर 2023 पासून त्यांचा कोणताही संपर्क झाला नाही. सुरुवातीला पोलिसांनी त्या बेपत्ता असल्याची तक्रार देखील दाखल केली नाही. बऱ्याच कालावधीनंतर पोलिसांनी तक्रार दाखल केली. अनेक महिने त्यांचा तपास करण्यात आला तरीही काही उपयोग झाला नाही. अखेर तब्बल 5 महिन्यांनी त्या नेत्याच्या भावाला पोलिसांनी उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये बोलावलं. पाठीवरील एका टॅटूमुळे त्यांची ओळख पटली.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काय आहे प्रकरण?
मध्य प्रदेशातल्या अशोक नगरमधील भाजपाच्या महिला नेत्या आणि मंडल अध्यक्ष ममता यादव यांच्या मृत्यूचा गुंता आणखी वाढलाय. त्यांच्या मृत्यूला आता 9 महिने उलटले आहेत, तरीही हा गुंता कायम आहे. ममता यादव अशोकनगरच्या होत्या. पण, त्यांचा मृतदेह प्रयागराजमध्ये मिळाला. त्यामुळे हे प्रकरण मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश दोन्ही पोलिसांच्या अखत्यारीत येतं. इतकंच नाही तर त्यांचा मृतदेह अजूनही घरच्यांना अंत्यसंस्कारासाठी सोपवण्यात आलेला नाही. त्यांची हत्या कशी झाली ? की हा सामान्य मृत्यूचं प्रकरण आहे? असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित झाला आहे.
नातेवाईकांचा आरोप
ममता यांचे भाऊ राजभान यांनी सांगितलं की, 'आम्हाला पोलिसांनी मदत केली नाही. ममताला काही गूंड त्रास देत होते. माझ्या जीवाला धोका आहे, असं ममतानं आम्हाला सांगितलं होतं.' तर 'आम्ही पोलिसांकडं जात होतो. पण, त्यांनी आम्हाला फक्त आश्वासन दिलं. कधीही मदत केली नाही. पोलिसांनी आमच्या मुलीचा मृतदेह आम्हाला सोपवावा. त्यानंतरच आम्हाला आमच्या पद्धतीनं तिच्यावर अंत्यसंस्कार करता येतील,' असं ममताच्या आई रैनाबाई यांनी सांगितलं.
ट्रेंडींग बातमी - पुण्यात चाललंय काय ! सांस्कृतिक राजधानीला पडलाय ड्रग्जचा विळखा
एकाच नंबरवरुन 86 वेळा कॉल
ममता यांच्या कॉल डिटेल्सनुसार त्यांना 10 दिवसांमध्ये एकाच नंबरवरुन 86 वेळा कॉल आला होता, ही माहिती उघड झाली आहे. त्यांच्याकडं काही व्हिडिओ आणि पेन ड्राईव्ह होते. त्यामुळे त्यांच्यावर राजकीय दबावही टाकला जात होता. मी माझ्यासोबत पेन ड्राईव्ह घेऊन जात आहे, अशी माहिती त्यांच्या भावानं दिली. बहिणीकडं अनेक राजकीय नेत्याचे रहस्य होते, असा दावा भावानं केलाय.
या प्रकरणाबाबत अशोक नगरचे पोलीस अधिकारी विनित जैन यांनी सांगितलं की, 'मांडा पोलिसांना एक मृतदेह मिळाला होता. त्यावरी टॅटूच्या आधारावर मृतदेहाची ओळख पटली. डीएनच्य़ा माध्यमातून या तपासाला आणखी वेग मिळेल. पोलिसांनी 26 सप्टेंबर रोजी मृतदेह ताब्यात घेतला होता. यामधील नियमानुसार जिथं मृतदेह मिळालाय तिथं कारवाई केली जाते. मांडा पोलिसांना आम्ही पुढील कारवाईबाबत पत्र लिहिलं आहे.
मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी या प्रकरणात डीजीपींना पत्र लिहिलं आहे. त्यांनी या प्रकरणाचा तपास NIA किंवा STF कडं सोपवावा अशी मागणी केलीय.